ताज्या घडामोडी
डॉ. अस्मिताताई राजेंद्र जगताप यांच्याहस्ते “तेजोमय 2020” दिवाळी अंकाचे प्रकाशन
पुणे : पुणे डॉक्टर्स असोसिएशन पुणे यांच्यातर्फे दरवर्षी “तेजोमय 2020” आरोग्यविषयक दिवाळी अंक प्रकाशन डॉ. अस्मिताताई राजेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
हा प्रकाशन सोहळा दि 8 नोव्हेंबर 2020 झाला.
यावर्षीचा 7 वा अंक हा स्त्रीरोग आणि त्यांचे आरोग्य यावर ‘ मी निरोगी -मी आनंदी’ जनजागृतीपर विशेषांक याचे प्रकाशन सोहळा डॉ. अस्मिताताई राजेंद्र जगताप, कार्यकारी संचालिका भारती विद्यापीठ मेडिकल फौंडेशन पुणे यांचे हस्ते डॉ नितु मांडके IMA सभागृह टिळक रोड पुणे येथे झाले.
याप्रसंगी पुणे डॉक्टर्स असोशिएशन चे अध्यक्ष विश्वस्त आणि पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पुणे शहरातील डॉक्टर उपस्थित होते.
Share