महाराष्ट्र

कोल्हापूर येथे 8 रोजी बीआरएसपीचा वर्धापन दिन

सांगली :  बहुजन रिपब्लिकन सोशालिष्ट पार्टीचा ५वा वर्धापन दिन रविवार दि.८नोहेंबर रोजी महालक्ष्मी हॉल,हाॅटेल महाराजा, चौक रुईकर कॉलनी कोल्हापूर येथे जिल्हा कमिटीमार्फत आयोजित करण्यात आला आहे.
पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.डाॅ.सुरेश माने यांच्या अध्यक्षतेखाली वर्धाापनदिन   होणार आहे .यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक सयाजी वाघमारे व प्रदेश सचिव रामचंद्र तथा आर.के.कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी पक्षाचा आढावा घेतला जाणार आहे.तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.डाॅ.सुरेश माने मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे नियोजन संदीप सुर्यवंशी (जिल्हाध्यक्ष बीआरएसपी),गौतम करुणादित्य(उपाध्यक्ष),किसन मोटे, वैशाली गंगावणे, श्रीकांत कांबळे,ओमेश्वरी माने किशोर कांबळे,लक्ष्मण कांबळे, सुरेश कांबळे हे करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close