ताज्या घडामोडी
भिलवडी पाटील मळ्यात आईनेच केला 13 दिवसाच्या बालकाचा खून
भिलवडी : पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पाटील मळ्या जवळील माळी वस्तीमध्ये राहणाऱ्या एका आईनेच पोटच्या बाळाचा खून केला असून, सदर बाळाचा मुतदेह पाण्याच्या टाकीमध्ये टाकून पुरावा नष्ट केल्याची घटना भिलवडी येथील माळी वस्तीवर येथे घडली आहे.
भिलवडी ता.पलूस येथील पाटील मळ्यानजीक असणाऱ्या माळी वस्तीमध्ये बुधवार दि.४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास एका १३ दिवसाच्या बालकाचा खून झाल्याची घटना घडली असून प्रथमदर्शनी अज्ञात व्यक्तींनी खून केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती परंतु तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कुटुंबातील व्यक्ती, शेजारील लोक यांची कसून चौकशी करून केवळ बारा तासांच्या आत संशयित आरोपी पर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे.सदर बालकाचा खून त्याच्या जन्मदात्या आईनेच केला असल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाले आहे.मयत बालकाची आई ऐश्वर्या अमित माळी हिच्या १३ दिवसाच्या बालकाचे सदर बालकाच्या जन्मानंतर केवळ दोन दिवसातच ऑपरेशन झाले होते.सदर बालकाला होणाऱ्या वेदना या तिला पाहवत नव्हत्या सदर बालकाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या ऐश्वर्या माळीने नैराश्येतून आपल्या पोटच्या चिमुरड्या निष्पाप बालकाचा खून केला असल्याची कबुली बुधवारी रात्री उशिरा पोलिसांना दिली असल्याची माहिती भिलवडी पोलीसांनी दिली आहे.सदर घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस करीत आहेत. एका महिलेने पोटच्या बाळाचा खून केला. तसेच तिने बाळाचा मुतदेह पाण्याच्या टाकीमध्ये टाकून पुरावा नष्ट केल्याची माहिती भिलवडी पोलिसांनी दिली .भिलवडी ता.पलूस येथील पाटील मळ्यानजीक असणाऱ्या माळी वस्तीमध्ये बुधवार दि.४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास एका १३ दिवसाच्या बालकाचा खून झाल्याची घटना घडली. प्रथमदर्शनी अज्ञात व्यक्तींनी खून केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती ,परंतु तासगाच्या पोलिस उप अधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी तपासाची केली. कुटुंबातील व्यक्ती, शेजारील लोक यांची कसून चौकशी आठ तासांच्या आत संशयित आरोपीचा पोलिसांनी छडा लावला. .सदर बालकाचा खून त्याच्या जन्मदात्या आईनेच केला असल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघड झाले आहे.मयत बालकाची आई ऐश्वर्या अमित माळी हिच्या १३ दिवसाच्या बालकाचे सदर बालकाच्या जन्मानंतर केवळ दोन दिवसातच ऑपरेशन झाले होते.सदर बालकाला होणाऱ्या वेदना या तिला पाहवत नव्हत्या सदर बालकाची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या ऐश्वर्या माळीने नैराश्येतून आपल्या पोटच्या चिमुरड्या निष्पाप बालकाचा खून केला असल्याची कबुली बुधवारी रात्री उशिरा पोलिसांना दिली.अशी माहिती भिलवडी पोलिसांनी दिली.
Share