शब्दाला जागणारा नेता सहकार, कृषी मंत्री डॉ.विश्वजित कदम
सांगली : महाराष्ट्रात स्पष्ट आणि रोखठोक बोलणारे नेते, दिलेल्या शब्दाला जागणारे नेते म्ह्णून आदरणीय माजी मंत्री कै. पंतगराव कदम यांची ख्याती होती. हाच वारसा चालवण्याचे आणि अनेकांना आधार, आणि दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून राज्याचे महाराष्ट्र राज्याचे सहकार व कृषी राज्य मंत्री मा.ना.डॉ.विश्वजित कदम यांनी वडिलांनंतर जोपासण्याचे काम केले आहे.
मंत्री विश्वजित कदम यांनी फेसाटीकार तथा युवा साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते, जतच्या साहित्य क्षेत्रातील भूषण मा.नवनाथ गोरे यांना दिलेला शब्द पळत पुन्हा आपला वारसा जपलेला आहे. नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठामध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी भारती विद्यापीठामध्ये ‘वरिष्ठ लिपिक’ व विचार भारती या नियतकालिकाच्या ‘सहसंपादक’ पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. हे नियुक्ती पत्र जत तालुक्याचे विद्यमान आमदार मा. विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या शुभहस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदान करण्यात आले. यावेळी राज्य शासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ दिनकर कुटे, प्रा तुकाराम सन्नके व लेखक महादेव माने उपस्थित होते.