ताज्या घडामोडी

निर्यातक्षम द्राक्ष बागांची ग्रेपनेटव्दारे नोंदणी करा : जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी

द्राक्ष बागांच्या नोंदणीचा कालावधी दि. 1 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर 2020

सांगली, दि. 23 : सन 2020-21 या वर्षामध्ये युरोपियन देशांना द्राक्ष निर्यात करू इच्छिणाऱ्या द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या द्राक्ष बागांचे नुतनीकरण किंवा नवीन बागांची ग्रेपनेटव्दारे नोंदणी करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
बागांची नोंदणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. द्राक्ष बागांच्या नोंदणीचा कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2020 ते दि. 29 नोव्हेंबर 2020 असा आहे. अपेडा अंतर्गत दि. 8 ऑक्टोबर 2020 पासून ऑनलाईन कार्यप्रणाली कार्यान्वीत झाली आहे. ग्रेपनेटव्दारे नोंदणी करीता अंतिम दिनांक 29 नोव्हेंबर आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी हे समन्वय अधिकारी आहेत. निर्यातक्षम द्राक्ष बागेंची नोंदणी / नुतनीकरण करण्याकरिता अर्जदाराने विहीत प्रपत्रात अर्ज विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. यासाठी कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधावा. अर्जामध्ये मोबाईल क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत बागेचा नकाशा व 7/12, 8अ, बागेचा नकाशा व 50 रूपये नोंदणी फी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित द्राक्ष बागायतदारांनी नजीकच्या तालुका कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. मास्तोळी यांनी केले आहे.
सर्व अर्ज संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्राप्त झालेल्या अर्जाचे नोंदणी / नुतनीकरण करण्याकरिता अपेडाच्या वेबसाईटवर अद्यावत करण्याची कार्यवाही तालुकास्तरावरील कार्यालयातच करण्यात आली असल्याचे श्री. मास्तोळी यांनी सांगितले.
00000

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close