ताज्या घडामोडी

मास्कचे दर्जानुसार अधिकतम विक्री मल्य निश्चित : सहाय्य आयुक्त (औषधे) नि. प. भांडारकर

सांगली, दि. 23 : कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मास्कचा वापर अनिवार्य असून सर्व सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मास्कची दर्जानुसार (२ प्लाय, ३ प्लाय व एन ९५) महाराष्ट्र राज्यातील अधिकतम विक्री मुल्य महाराष्ट्र शासनाने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजीच्या शासन निर्णयाव्दारे निश्चित केले आहे. संबंधितांनी योग्य त्या किंमतीला मास्क विक्री करावी व शासन आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) नि. प. भांडारकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने मास्कच्या दर्जानुसार निश्चित केलेले अधिकतम विक्री मुल्य (MRP per piece + GST) रूपयांमध्ये पुढीलप्रमाणे.
(1) NIOSH certified N-95 V Shape (Including Magnum N-95 V Shape mask) – 19 (2) NIOSH certified N-95 3D mask (Including Magnum N-95 MH 3D mask)- 25 (3) NIOSH certified N-95 without valve (including Venus 14488 V4400-N-95 mask without valve) – 28 (4) NIOS cetified N-95 cup shape mask without valve (a) Magnum N-95 MH cup 49 (b) Venus CN95 + N-95 cup shape mask without valve 29 (c) Venus 713W-N-95-6WE cup style without valve 37 (d) Venus 723W-N-95-6RE cup style without valve 29 (5) FFP2 Mask : ISI certified (including Venus 14491 V-4420 + FFP2 mask) 12 (6) 2 Ply surgical with loop or tie 3 (7) 3 Ply surgical with Melt Blown (including Benus 14520-3 Ply Mask) 4 (8) Doctors kit of 5 N-95 masks + 5 3Ply melt blown mask (including Venus doctors kit) – 127.
शासन निर्णयानुसार विविध दर्जाच्या मास्कची विहीत केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहील. ही मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या / वितरक/किरकोळ विक्रेते यांना लागू राहील. सर्व मास्क उत्पादक कंपन्या / वितरक/किरकोळ विक्रेते यांना मास्कचा दर्जा व त्याची निर्धारीत कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. या प्रकरणी काही तक्रार उद्भवल्यास राज्य स्तरावर आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे तक्रार निवारणासाठी सक्षम प्राधिकारी असतील.
रूग्ण सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील शासकीय व खाजगी रूग्णालये/नर्सिंक होम/कोवीड केअर सेंटर/डेडीकेटेउ कोवीड हॉस्पीटल इत्यादी यांना मास्कचा पुरवठा करताना मास्कच्या विहीत अधिकतम विक्री मुल्य मर्यादेच्या 70 टक्के दराने उपलब्ध करून देणे आवश्यक राहील व खाजगी रूग्णालयांनी उपरोक्त दराने मास्कची खरेदी केल्यानंतर खरेदी किंमतीच्या 110 टक्के पेक्षा जास्त रक्कम रूग्णांकडून आकारता येणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले असल्याचे श्री. भांडारकर यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close