सांगली

खाजगी रूग्णालयेे, आरोग्य विषयक आस्थापना रूग्णांसाठी सुरू ठेवणे बंधनकारक : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 6 : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सामान्य जनतेला आरोग्य विषयक सेवा देणे अत्यंत आवश्यक असताना जिल्ह्यामधील काही खाजगी रूग्णालये बंद ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. सांगंली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व नोंदणीकृत खाजगी रूग्णालये, मान्यता प्राप्त वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने व संबंधित आरोग्य विषयक खाजगी आस्थापना सर्व सोयीसुविधांसह त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या रूग्णांसाठी किंवा ज्या रूग्णांना वैद्यकीय सेवेची आवश्यकता आहे, अशा रूग्णांसाठी सुरू ठेवणे संबंधितांवर बंधनकारक राहील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
या आस्थापनांना कोरोना विषयक प्रतिबंधात्मक बाबींच्या उपाययोजना उदा. हँडवॉश, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close