महाराष्ट्र

महास्वयंम पोर्टलवर सेवायोजन कार्ड तात्काळ अद्ययावत करा : आ. बा. तांबोळी

सांगली, दि. 5 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली या कार्यालयाच्या विभागाच्या महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केलेल्या व आधार कार्ड नंबर व ईमेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी नोंदणीमध्ये आधारकार्ड नंबर व ईमेल, मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे. अन्यथा सेवायोजन कार्ड रद्द होईल. तरी सेवायोजन कार्ड तात्काळ अद्ययावत करणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी यांनी केले आहे.
ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील (Home page) रोजगार (Employment) हा पर्याय निवडून नोकरी साधक (Job Seeker) हा पर्याय निवडून आपला युजर आयडी व पासवर्ड वापरून Login व्हावे व आधारनंबर या ठिकाणी आपला आधार नंबर नमुद करून कॅप्च्या (captcha) टाकून सबमिट (Submit) या बटनावर क्लिक करावे. जेणेकरून आपली माहिती अद्ययावत होईल. अन्यथा सेवायोजन कार्ड रद्द होईल. अद्यापही महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी न केलेल्यांनी नोंदणी करून ऑनलाईन जॉबफेअर, ऑनलाईन करिअर गायडन्स व इतर योजनांचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास 0233-2600554 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. तांबोळी यांनी केले आहे.
नविन नाव नोंदणीसाठी पाथ – www.mahaswayam.gov.in – Home page – Employment – Job Seeker – Login. आधार लिंक करण्याच पाथ – www.mahaswayam.gov.in – Home page – Employment – Job Seeker – User ID – PassWord – Login – Adhar Number – Captcha.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close