सांगली

कोविड-19: तक्रार निवारण कक्ष,नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

बेडची उपलब्धता, ॲम्बुलन्स सेवा, अडीअडचणी व तक्रारीचे निवारण होणार

सांगली, दि. 5 : सांगली जिल्ह्यामध्ये सदयस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून कोरोना रुग्णांना बेडची उपलब्धता, ॲम्बुलन्स सेवा तसेच त्यांच्या अडीअडचणी व तक्रार निवारणासाठी तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यासाठी नियंत्रण कक्ष तसेच तक्रार निवारण कक्ष 24 तास कार्यान्वीत केला आहे. तरी नागरिकांनी त्यांच्या अडीअडचणी व तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण कक्ष, नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
तक्रार निवारण कक्ष, नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

अ.क्र.
स्वरूप
संपर्क क्रमांक

1.
तक्रार निवारण कक्ष
टोल फ्री क्रमांक 1077

2.
ॲम्बुलन्स सेवा मोफत
108/102

3.
ॲम्बुलन्स सेवा (Paid)
0233-2310555

4.
बेड अथवा खाटांच्या उपलब्धतेबाबत
0233-2375500
0233-2374500

5.
जिल्हा परिषद नियंत्रण कक्ष
0233-2374900
0233-2375900

6.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात रूग्णवाहिका अथवा शववाहिका सेवा
0233-2373725

7.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बेड अथवा खाटांच्या
उपलब्धतेबाबत माहिती एका क्लिकवर मिळण्यासाठी पुढील लिंकचा वापर करावा
https://sangli.nic.in/covid-19
किंवा
http://smkc.gov.in/covid19

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close