सांगली

पलूस, कडेगाव तालुक्यात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

सांगली, दि. 4 : पलूस तालुक्यातील मौजे दह्यारी, मौजे पलूस, मौजे बांबवडे, मौजे ब्रम्हनाळ, मौजे सावंतपुर, मौजे नागराळे, मौजे पुणदीवाडी, मौजे राडेवाडी, मौजे अंकलखोप, मौजे आंधळी, मौजे भिलवडी व कडेगाव तालुक्यातील मौजे कडेपूर येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती कडेगाव उपविभागीय दंडाधिकारी गणेश मरकड यांनी दिली.
सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश कडेगाव उपविभागीय दंडाधिकारी गणेश मरकड यांनी दिले आहेत.
00000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close