सांगली

भिलवडी 5 दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय

भिलवडी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भिलवडी ग्रामस्थ,आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासन व व्यापारी संघटनेच्या वतीने स्वयंस्फूर्तीने भिलवडी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
भिलवडी आणि परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भिलवडी गावांमध्ये कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी भिलवडी गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शनिवारी दि.०५ सप्टेंबर पासून पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय भिलवडी ग्रामस्थ, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासन व व्यापारी संघटनेच्या वतीने स्वयंस्फूर्तीने घेण्यात आला.

यावेळी भिलवडी गावचे सरपंच विजयकुमार चोपडे,जि.प.सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर, तलाठी गौस महंम्मद लांडगे, ग्रामविकास अधिकारी आर‌.डी.पाटील,सर्कल अशोक लोहार,माजी जि.प.सदस्य संग्राम (दादा)पाटील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, शहाजी (भाऊ) गुरव यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close