महाराष्ट्र

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 27 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल, थेट कर्ज योजना, वैयक्तिक व्याज परतावा आणि गट व्याज परतावा योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एच. बिरादार यांनी केले आहे.
सन 2020-2021 या आर्थिक वर्षासाठी महामंडळाकडील विविध योजना राबविण्यासाठी उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यानुसार या योजनांचा लाभ दिला जाणार आहे. यामध्ये 20 टक्के बीज भांडवल योजनेसाठी बॅक/ महामंडळामार्फत कमाल 5 लाखापर्यंत वित्त पुरवठा केला जाणार आहे. थेट कर्ज योजनेला महामंडळामार्फत कमाल 1 लाखापर्यंत, वैयक्तिक व्याज परतावा योजनेसाठी बॅकेमार्फत कमाल 10 लाख आणि गट व्याज परतावा योजनेसाठी बॅकेमार्फत कमाल 50 लाखापर्यंत वित्त पुरवठा केला जाणार आहे. 20 टक्के बीज भांडवल आणि थेट कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांनी ऑफलाईन तर वैयक्तिक व्याज परतावा आणि गट व्याज परतावा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत.
ऑफलाईन योजनेसाठीचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्ज मिळणेसाठी फक्त संबंधित अर्जदाराने जात प्रमाणपत्र आणि आधार कार्ड मुळ प्रत घेऊन स्वत: जिल्हा कार्यालयात येणे आवश्यक आहे. ऑनलाईन योजनेसाठी पोर्टल ओपन असून www.msobcfdc.org या संकेतस्थळावर “व्याज परतावा योजना” हा पर्याय निवडावा व प्रस्ताव ऑन लाईन सादर करावा. अपलोड केलेली सर्व कागदपत्रे ही मुळ असावीत. झेरॉक्स चालणार नाहीत. अधिक माहितीसाठी www.msobcfdc.org या संकेतस्थळावर भेट द्यावी किंवा महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पहिला मजला, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली, दुरध्वनी क्रमांक 0233-2321513 येथे संपर्क करावा, असे आवाहनही श्री. बिरादार यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close