महाराष्ट्र

आटपाडी तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

सांगली, दि. 27 : आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी (दत्तनगर), करगणी (वडार गल्ली), य.पा. वाडी (शिवाजी चौक व दत्त मंदिर) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिली.
सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश विटा उपविभागीय दंडाधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close