महाराष्ट्र

सार्थ अभिमान…!

संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून आतापर्यंत जगातील लाखो नागरिकांचा बळी घेतला आहे. या घातक विषाणूसमोर सर्वांनीच गुडघे टेकले असताना पुण्यातील भारती हॉस्पिटलमधून एक आनंदाची व महत्वाची बातमी समोर आली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘ऑक्‍सफर्ड आणि ऍस्ट्राझेन्का’ च्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील भारत देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये आज करण्यात आली. संपूर्ण देशातील १४ केंद्रामध्ये या मानवी लसीची चाचणी होणार आहे. त्याचा पहिला मान आज पुण्यातील आपल्या भारती हॉस्पिटलला मिळाला आहे. आज या लसीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी ५ लोकांवर करण्यात आली. या चाचणीसाठी लसीच्या उत्पादनाचे हक्क असणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ही लस “कोविशील्ड (AZD1222)” या नावाने भारतामध्ये आणली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी जगातील सर्वात जास्त लसी तयार करते. दरवर्षी ही कंपनी १.५ अब्ज डोस तयार करते. यामुळे जगाला कोरोनाची लस मिळण्यासाठी भारताशिवाय पर्याय राहणार नाही, हेही तितकंच खरं आहे.
कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून ५-६ महिने अविरतपणे सेवा देण्याचे काम चालू आहे. विशेषतः भारती विद्यापीठाचे प्र.कुलपती डॉ.शिवाजीराव कदम सर, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि कृषी व सहकार राज्यमंत्री ना.डॉ.विश्वजीत कदम साहेब, भारती हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.अस्मिताताई जगताप-कदम व मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भारती हॉस्पिटलची यशस्वीपणे वाटचाल चालू आहे. या वाटचालीमध्ये डॉ.संजय ललवाणी, डॉ.जितेंद्र ओसवाल व डॉ.सोनाली पालकर आदींसह आपल्या जीवाची पर्वा न करता हॉस्पिटलमार्फत अहोरात्र सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार व कर्मचारी वर्गास माझा मनापासून सलाम…!

#Covid19Vaccine #SerumInstitute
#BharatiHospitalPune #ClinicalTrial
#DrVishwajeetKadam

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close