भिलवडी पोलिस ठाण्याचे कोरोना योद्धा विशाल पांगे पुन्हा जनसेवेसाठी सज्ज

भिलवडी : भिलवडी पोलिस ठाण्याचे विशाल पांगे यांनी कोरोनावर मात करून ते पुन्हा जनसेवेसाठी सज्ज झाले आहेत.
विशाल पांगे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. इस्लामपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. विशाल पांगे यांच्याबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेले त्यांची आई, वडील तसेच पत्नी यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावरतीही उपचार सुरू होते. विशाल पांगे यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनी ही कोरोनावर मात केली आहे.कोरोना योध्याने कोरोनावरती मात करून, पुन्हा एकदा जनसेवेसाठी सज्ज झाल्याने भिलवडी पोलिस ठाण्याच्या वतीने विशाल पांगे यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली.भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.