प्रवीण तरडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : नितीन गोंधळे
सांगली : चित्रपट अभिनेता , मनुवादी,प्रविण तरडे नावाच्या हरामखोर ज्याने संपूर्ण भारत देश चालतो त्या संविधानाचा पाट म्हणून उपयोग करून त्या संविधानावर गणपती
बसवून संपूर्ण आंबेडकरी जनतेचा व भारतीय नागरिकांचा अपमान केला आहे.त्यामुळे संपूर्ण भारतातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्या तरडेवर
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणत यावा, अशी मागणी सांगली जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नितीन गोंधळे यांनी केली.
नितीन गोंधळे म्हणाले, संविधान हा आमचा प्राण आहे , भारतीय संविधान हे देशासाठी सर्वोच्च आहे,एकवेळ आमच्या घरादाराची राखरांगोळी केली तरी चालेल पण भारतीय संविधानाचा अपमान केल्यास
आम्ही कदापी सहन करणार नाही
संविधानाचा अपमान करणारे तरडयावर व त्यांच्या मागे कोणती शक्ती आहे त्यांच्या वर पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा सांगली
तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते व
त्यांचे वर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा सांगली चे वतीने करण्यात येते, अशी माहिती नितीन वसंत गोंधळे
सांगली जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी दिली.