महाराष्ट्र

केंद्रीय पत्रकार संघाच्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी

मुंबई : केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) च्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची निवड संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसाळकर यांनी ई-मेल द्वारे नियुक्ती पत्र देऊन केली आहे.
शाहरुख मुलाणी हे चळवळीतील कार्यकर्ते असल्याचे त्याचा निडर, निर्भीड, थेट हस्तक्षेप, मनमिळाऊ स्वभाव असल्याने त्यांचा कडे सर्वांना आपलंसं करण्याची विशेष कला यामुळे नामांकित वृत्तपत्र संस्थेचे चांगलेच धाबे दणाणले आहे. अनेक नामांकित वर्तमानपत्र, टीव्ही न्यूज चॅनल वार्ताहर यांना वेळेवर वेतन देत नाही, कामावरून कमी करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आता पत्रकारांचा खरा वाली आला आहे अशी भावना पत्रकारांच्या वर्तुळात जोरदार होताना दिसत आहे. येत्या काळात पत्रकारांची मोठी संघटना तयार करणार असून लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाण्याऱ्या पत्रकारांची एकजूट करणार असल्याची प्रतिक्रिया नूतन मंत्रालयीन सचिव मुलाणी यांनी दिली आहे. येणाऱ्या काळात मंत्रालयात पत्रकारांचे, जनसामान्यांचे न्यायीक विषय सरकार दरबारी मांडणे, संघातील ग्रामीण पत्रकारांच्या भेडसावणाऱ्या समस्या यासाठी मुख्यमंत्री यांचे कडे जोरदार पणे मांडणार असल्याचे मुलाणी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांना एक नवी दिशा देण्याचे काम करणार असल्याचे मुलाणी यांनी सांगितले. राज्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा विषयांचे बातमीपत्र गाजले आहेत. त्यांच्या या कार्याची शासन दरबारी विशेष नोंद घेतली गेली आहे.

दरम्यान कसाळकर म्हणाले की, आपण पत्रकारांच्या विकास व सुरक्षतेसाठी वेळोवेळी केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून होणारा पत्रव्यवहार तसेच इतर महत्त्वाच्या विषयांचा पत्रव्यवहार मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी कराल तसेच आपण कायदे व नियमांचे सदैव पालन करून संघटनेचे उद्देशानुसार पत्रकार जगताच्या हितासाठी सदैव कार्यरत राहाल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच वंचित पत्रकारांना न्याय देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीपत्रामध्ये संघटनेचे ध्येय धोरणाच्या आधिन राहुन आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबुत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल ही अपेक्षा ! व्यक्त करीत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close