महाराष्ट्र

रुग्ण हक्क परिषदेच्या विधिमंडळ कामकाज सचिवपदी मधुकर पारसे,मंत्रालयीन सचिवपदी शाहरूख मुलाणी

मुंबई : रुग्णांच्या हक्कांची चळवळ उभी करणारी आंदोलक संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद अल्पावधीतच नावारूपाला आली आहे, सामाजिक विषयांवरील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद सातत्याने कार्यरत आहे. शासनदरबारी अनेक प्रलंबित असलेले विषय, विधिमंडळ आणि मंत्रालयीन कामकाजात पाठपुरावा करण्याचे काम अनेक दिवसांपासून करत असणारे रुग्ण हक्क परिषदेचे मुंबईस्थित पदाधिकारी मधुकरराव पारसे यांची विधिमंडळ कामकाज सचिवपदी तर मंत्रालयीन सचिव पदी मुंबईतीलच शाहरुख मुलाणी यांची निवड रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.
मूळचे माळशिरस, जि. सोलापूर येथील मधुकर पारसे यांना मंत्रालय – विधिमंडळ कामकाजाचा गेली १८ वर्षे प्रदीर्घ अनुभव आहे. गेली वर्षभर रुग्ण हक्क परिषदेत ते कार्यरत आहेत. आज त्यांची विधिमंडळ कामकाज महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली तर मंत्रालयातील पत्रकारितातेत अभ्यासू मांडणी करणारे शाहरुख मुलाणी यांची मंत्रालयीन सचिव पदी महाराष्ट्र प्रदेश कमिटीत नियुक्ती केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close