सांगली

भिलवडी :कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळेच नदीपात्रात विसर्ग चालू आहे. आता थोडं पाणी ओसरलं आहे. मात्र तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सदैव सोबत असल्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांनी सांगितले.

येथील मौलानानगर परिसरात पाणी शिरल्याने तेथील ग्रामस्थ हायस्कूलमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्याशी डाॅ. कदम यांनी संवाद साधला.

जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार राजेंद्र पोळ, तलाठी गौसमहंमद लांडगे आदींसह जिल्हा व स्थानिक प्रशासनातील सर्व उपस्थित होते.

पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधेचा आढावा त्यांनी घेतला. स्वतः जेवणाची चव चाखली. ते वेळेत मिळतं का याची खात्रीही केली. सद्या कोरोना असल्यामुळे थोडे अंतर ठेवा आणि मास्क वापरा असा सल्ला देवून तब्येतीची काळजी घेण्याचेही डाॅ. विश्वजित कदम यांनी सांगितले. यावेळी माजी जि. प. सदस्य संग्रामदादा पाटील, बाळासाहेब मोहिते, चंद्रकांत पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close