महाराष्ट्रसांगली

कॉन्टक्ट ट्रेसिंग व टेस्टींग मिशन मोड करा : आरोग्य व कुटंब कल्याणमंत्री राजेश टोपे

सांगली, दि. 17 : कोरोनाबाधीतांचा वाढीचा दर हा राज्याचा 2 टक्के आहे तर सांगली जिल्ह्याचा दर 4 टक्के आहे. तसेच रुग्ण्‍ दुप्पटीचा दर राज्याचा जवळपास 30 दिवसांचा आहे. तर जिल्ह्याचा 17 दिवसांचा आहे. याचाच अर्थ सांगलीत मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी कॉन्टक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग मिशन मोड करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी कॉन्टक्ट रेशो हा 8.87 वरुन किमान 15 पर्यंत गेला पाहिजे यातून सध्या सांगलीचा कोरोना संसर्गाचा चढता आलेख शिस्तबध्दरितीने काम सुरु ठेवून नक्कीच खाली अनू शकतो, असा विश्वास आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर येथे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशिल माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनिस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर ननंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील अदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अग्रेसिव्ह कॉन्टक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग हा एक चांगला उपाय असून तो योग्यप्रकारे करावा, 24 तास टेस्टिंग सुरु करण्यासाठी असणाऱ्या अडचणी सोडवाव्यात, मृत्यदर कमी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे. जिल्ह्याचा मृत्युदर सध्या 3 ते 3.5 टक्के असून तो 1 टक्क्यापर्यंत खाली आणण्यासाठी प्रयत्न करावा. जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या 400 खाटांच्या रुग्णालयासाठी आपण सकारात्मक असलो तरी, खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा कोव्हिड उपचारांसाठी उपलब्ध करुन घ्याव्यात. इंडियन मेडिकल असोशियेशन मधील जास्तीत जास्त खासगी वैद्यकीय व्यवसाईकांचा उपयोग करुन घ्यावा, असे निर्देशित करुन खासगी रुग्णालये सध्या रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. तसे न करता त्यांना पॉईंट ऑफ केअरलाच ॲन्टीजेंट टेस्ट कराव्यात व रुग्णावर आत्मविश्वासाने उपचार करावेत असे सांगितले. लेखा पथकांनी अधिक प्रभावी कामगिरी करुन, लोकांकडून अवाजवी दर आकारणी होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. स्वॉब तपासणी करुन अहवाल रुग्णांना मिळण्याचा कालावधी कमी करावा, त्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत. टेलिरेडिओलॉजीची सुविधा लवकरच महाराष्ट्रात उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आरोग्य मंत्री टोपे यांनी कंन्टेमेंन्ट झोनचा कालावधी रुग्ण सापडल्यापासून पुढे 14 दिवस करण्यात आल्याचे सांगून त्याप्रमाणे अंमलबजावणी करावे अशी सूचना दिल्या. तसेच सर्व डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना नातेवाईकांशी संवाद साधण्याची यंत्रणा ताबडतोब करावी असेही निर्देशित केले. शासकीय रुग्णालयांमध्ये सामान्य माणूस जात असल्याने या ठिकाणी आयसीयुची सुविधा वाढविण्यात यावी असेही त्यांनी सूचीत केले.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे तंतोत पालन करुन कॉन्टक्ट ट्रेसिंग रेशो 20 ते 25 पर्यंत वाढविण्याचा पर्यंत करावा, ॲन्टीजेंट टेस्ट वाढवाव्यात, रुग्ण व नातेवाईक यांच्यातील संवादाची यंत्रणा तात्काळ सुरु करावी असे सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोरोना विषयी जिल्ह्यातील सद्यस्थिती करण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्याची अनुषांगिक आवश्यकता आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close