महाराष्ट्रसांगली

इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे आज लोकार्पण

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री जयंत पाटील यांची उपस्थिती

सांगली, दि. 16, : इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्यावत कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सोमवार दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे. ज्यांच्या प्रयत्न,व संल्पनेतून हे अद्यावत कोविड हॉस्पिटल उभा राहिले आहे,ते राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. टाटा ट्रस्टच्यावतीने ९-१० कोटी रुपये खर्चून हे अद्यावत हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ४० बेडचे हे अद्यावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. यामध्ये १० बेड हे अतिदक्षता आहेत. २० बेडचा जनरल वॉर्ड असणार आहे. या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन,व व्हेंटिलेटरसह विविध अद्यावत,व खास सोई-सुविधा दिल्या जाणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरकडून कोविड रुग्णांवर अद्यावत उपचार केले जाणार आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विश्वास साळुंखे,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख,कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.राणोजी शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.

यापूर्वी इस्लामपूर येथे जिल्ह्याची कोविड आढावा बैठक आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री व पालकमंत्री जयंतराव पाटील हे दुपारी ३ वाजता येथील तहसीलदार कार्यालयात सांगली जिल्ह्याची कोविड आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीस जिल्ह्यातील अधिकारी,व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close