ताज्या घडामोडी

आज दिनांक १४/०८/२०२०रोजी गणेशोत्सव 2020 चे अनुषंगाने भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत खालील गावात भेटी देवून सोशल डिसटन्स ठेवून बैठका घेतल्या आहेत. धनगांव, खंडोबाचीवाडी , भिलवडी स्टेशन , हजारवाडी, बुरुंगवाडी येथे आम्ही बैठका घेवून गावातील आपत्ती व्यवस्थापन समिती व सर्व गणेश मंडळ प्रमुख कार्यकर्ते यांना कोरोना संसर्गजन्य परिस्थिती चे पार्श्वभूमी वर प्रत्येक कोणीही सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करू नये.गावात एक गाव एक गणपती संकल्पना राबवावी. जमा झालेल्या वर्गणीतून आप आपल्या गावात सी.सी.टी.व्ही. बसवावेत अथवा ती रक्कम कोव्हीड फंडास द्यावी असे अवाहन केले. तसेच कोरोना विषाणूचे पार्श्वभूमीवर शासनाने लागू केले सर्व प्रतिबंधीत आदेशाचे काटेकोर पालन करणे बाबत मार्गदर्शन केले आहे.
सदर गावापैकी धनगांव, खंडोबाचीवाडी , भिलवडी स्टेशन , हजारवाडी, बुरुंगवाडी या सर्व गावांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणार नसलेबाबतचे पत्र दिले आहे.

1) धनगांव
ठिकाण- हनुमान मंदीर
वेळ- १७ .१०ते १७ :४०
जन समुदाय- १५ ते २०
2) खंडोबाचीवाडी
ठिकाण- हनुमान मंदीर
वेळ – १७:५५ ते १८:३०
जन समुदाय – १५ते २०
3) भिलवडी स्टेशन
ठिकाण ग्राम पंचायत
कार्यालय
वेळ १८:४०.ते १९.१०
जन समुदाय २०ते २५
4) हजारवाडी
ठिकाण ग्रामपंचायत
वेळ १९.२० ते १९:५०
जन समुदाय १० ते १५
5) बुरुंगवाडी
ठिकाण ग्राम पंचायत
वेळ २०:००ते २०:३०
जन समुदाय २०ते २५
कैलास जे. कोडग
सहायक पोलीस निरीक्षक
भिलवडी पोलीस ठाणे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close