मृत्यूदर कमी येण्यासाठी रिपोर्टची वाट न पाहता उपचार सुरू करा: मंञी मुश्रीफ

कागलमध्ये कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन*
कागल दिनांक. 13 : कोरोना सदृश्य लक्षणे आढळताच तपासणी रिपोर्टची वाट न पाहता त्या रुग्णावर तात्काळ उपचारास सुरुवात करा त्याचबरोबर घरोघरी स्क्रीनिंग करून अॅटीजन टेस्टची संख्याही वाढवली पाहिजे या सर्व बाबींची गांभीर्याने अंमलबजावणी केल्यास मृत्युदर कमी येणार आहे, असे मंञी हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली.
कागल येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक.यावेळी को बेड केअर सेंटर येथील नवीन कोरोना वार्डचे उद्घाटनही करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजही अत्यवस्थ रुग्णांना बेड मिळत नसल्याने रात्री-अपरात्री आपणास याबाबत फोन येत आहेत, अशा पेशंटला घेऊन त्यांचे नातेवाईक दवाखान्याच्या दारोदारी फिरत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. एका बाजूला आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व सर्व शासकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन कोरोणा रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र बेड मिळत नसल्याने या सर्वांचीच बदनामी होत आहे.
कागल कोवीड केअर सेंटर या ठिकाणी नव्याने उभारलेल्या हॉलमध्ये 85 बेडची सोय होणार आहे. यापैकी 15 बेड ऑक्सिजनसह असणार आहेत. तसेच याठिकाणी उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी पिण्याचे एक्वागार्डचे थंड – गरम पाणी व आठ गरम पाण्याच्या किटल्या, फॅन, अंघोळीसाठी गिझरसह दोन बाथरूम, आठ शौचालय, याबरोबरच या ठिकाणी कार्यरत महिला व पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीइ किट बदलण्यासाठी वेगवेगळी कंपार्टमेंट अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करिता सर्व सुविधांयुक्निवासस्थानाचीही व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे.
कागल तालुक्यात एकूण 336 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी 171 पूर्ण बरे झाले असून कागल येथील कोविड केअर सेंटर येथे 46, सीपीआर मध्ये 5, खाजगी दवाखान्यात 53 व घरी उपचार घेणारे 48 असे 152 रुग्ण अँक्टिव्ह आहेत. तसेच कागल येथील 6 मुरगूड येथील चार व दौलतवाडी, बेलेवाडी काळम्मा व बोरवडे येथील प्रत्येकी एक असे 13 कोरोना बाधित मयत झाले आहेत.
या बैठकीला प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, कागलचे प्रभारी पोलिस निरीक्षक यादव, मुरगूडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते.