जत: कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
सांगली, दि. 11 : जत तालुक्यात जत शहरात दत्त कॉलनी, रोहिदासनगर व विठ्ठलनगर, सोरडी (श्री समर्थ समाध गिरजी महाराज वसतिगृह), येळवी (पारेकर-माने वस्ती), जाडरबोबलाद (सौदागर गल्ली), दरीकोणूर (नागणे वस्ती) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांंनी दिली.
सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत.
00000
जत तालुक्यात विविध ठिकाणची कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द
सांगली, दि. 11 : जत तालुक्यातील वळसंग येथील सुतार व माळी गल्ली, उमदी येथील मिरजकर हॉस्पीटल व पारधी वस्ती, को. बोबलाद येथील समर्थ क्लिनीक, निगडी खु. येथील काशीद वस्ती नं. 2 व बारुदवाले वस्ती, धावडवाडी येथील शेख व मुजावर वस्ती, अचकनहळ्ळी येथील मेंढगिरी वस्ती, जत शहरातील पार्वतीनगर, कोठावळे प्लॉट, मोरे कॉलनी, शेगाव येथील एसआरडी स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेजजवळ, गुलगुंजनाळ येथील कोळी वस्ती येथे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रात शेवटचा रूग्ण आढळून आल्यापासून 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे सदर क्षेत्रासाठी जारी करण्यात आलेली कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जत उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी जारी केली आहे.