माजी सैनिकाच्या विधवांच्या पाल्यासाठी एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार
सांगली, दि. 11 : सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात 10 वी व 12 वी च्या बोर्डाच्या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या माजी सैनिकाच्या विधवांच्या पाल्यांसाठी एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी आवश्यक कागदपत्रासह दिनांक 15 सप्टेबर 2020 पर्यत अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी वि. बा. पाटील (निवृत्त) यांनी केले आहे.
माजी सैनिकांच्या पाल्यांकरिता शिष्यवृत्तीसाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा
सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युतर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 टक्के गुणासह किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण होवून पुढील वर्गात शिकत असलेल्या व गतवर्षी शिष्यवृत्ती घेतलेल्या माजी सैनिकांच्या पाल्याकरिता शिष्यवृत्तीसाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पर्यत अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी वि. बा. पाटील (निवृत्त) यांनी केले आहे.
माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कारासाठी
15 सप्टेंबर पर्यत अर्ज करा
सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात 10 वी व 12 वी च्या बोर्डाच्या परिक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या व विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तसेच IIT, IIM, AIIMS अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी आवश्यक कागदपत्रासह दिनांक 15 सप्टेंबर 2020 पर्यत अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी वि. बा. पाटील (निवृत्त) यांनी केले आहे.