धनगाव,आमणापूर गावास यांत्रिक बोट प्रदान

पलूस : सांगली जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीच्या वतीने पलूस तालुक्यातील धनगाव व आमणापूर या गावास सांगली जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीच्या वतीने यांत्रिक बोट प्रदान करण्यात आली.पलूस पंचायत समिती येथे तहसीलदार राजेंद्र पोळ,गटविकास अधिकारी राहुल रोकडे,पंचायत समितीचे सभापती दिपक मोहिते,उपसभापती अरुण पवार यांच्या हस्ते पूजन करून बोटी ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आल्या.स्थानिक ग्रामपंचायतींनी गावातील तरुणांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे.बोटी व सामुग्री सुरक्षित ठेवाव्यात,आपत्ती ला सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती सुसज्ज ठेवावी. असे आवाहन तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले.
दत्ता उतळे म्हणाले की,गतवर्षी कृष्णेला आलेल्या महापुरात तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी तालुक्यातील गावांना विविध आघाड्यांवर मोठे सहकार्य केले आहे. कृष्णाकाठ ची गावे या अधिकारी वर्गाच्या नेहमी ऋणात राहतील.
यावेळी भिलवडी येथील बोट चालक नितीन गुरव,व्ही.डी.जामदार,धनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.जिजाबाई साळुंखे,उपसरपंच राजेंद्र साळुंखे,ग्रामसेवक प्रकाश माळी,दत्ता उतळे,शरद जाधव, घनःश्याम साळुंखे,संग्राम पाटील,रणजीत साळुंखे,संग्राम साळुंखे,अभिजित साळुंखे, आमणापूर चे सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी,मोहन घाडगे,ग्रामसेवक हणमंत कांबळे,निखिल कदम,महादेव पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.