कोल्हापूर येथे कोरोना रोखण्यासाठी फिरत्या वाहनाद्वारे जनजागृती

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्राल याच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो कोल्हापूरद्वारे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जन जागृती,प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना आणि आत्म निर्भर भारत या योजनांवर आधारित फिरत्या वाहन द्वारे प्रसिध्दी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यात प्रारंभ करण्यात आला.
या फिरत्या प्रसिध्दी वाहनाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी,प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींची माहिती पोहोचविली जाणार असून कोरोना प्रादुर्भावाच्या काळात केंद्र सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना,आत्मनिर्भर भारत अभियानाची माहिती ध्वनीफित तसेच चित्र स्वरुपात देण्यात येणार आहे.हे वाहन कोल्हापूर शहर परिसर आणि आजुबाजूच्या ग्रामीण भागात प्रचार व प्रसार करणार आहे. क्षेत्रीय लोक संपर्क कार्यालयाद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजना व लोकाभिमुख निर्णयांची माहिती ग्रामीण भागात जावून देण्यात येते ,जेणेकरून सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला मिळावा. हा मुख्य हेतू आहे.