विचारपुष्प

लडाख आदिवासींच्या पर्यावरण स्नेही पुनर्वसनासाठी जल व्यवस्थापनामधले अभिनव प्रारूप

सोनम वांगचुक आणि HIAL चमू
भारतीय हिमालयाने वेढलेले ‘जगाचे छत’हे स्थान म्हणजे गोड्या पाण्याचे विशाल ग्लेशियर आणि मानवी संस्कृतीच्या सुरवातीच्या काळापासून जीवन टिकवून ठेवणाऱ्या मुख्य आशियाई नद्यांचा प्राथमिक स्त्रोत आहेत. आधुनिक काळात ही ग्लेशियर अद्यापही पाण्याचा प्राथमिक स्रोत आहेत.अब्जावधी भारतीय विशेषकरून लडाख मधल्या आदिवासी जमातीसाठी, जे उंचावरच्या वाळवंटात हिमनदी वितळून निर्माण झालेल्या पाण्यावर अवलंबून आहेत. हिमालयातील पाणलोटाच्या उत्तर काठावरच्या लडाखची आगळी भौगोलिक आणि हवामान विषयक वैशिष्ट्ये आहेत. शीत वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाखचे क्षेत्रफळ 96701 स्क्वेअर किमी आणि सरासरी उंची 3000 मीटर आहे. वार्षिक 100 मिमी पाऊस आणि तीव्र तापमान (-30 ते 30) आहे. ऑक्टोबर-मार्च या काळात मोठा भाग थंडीने वेढलेला रहात असून वर्षाचा केवळ एक तृतीयांश काळ शेतीसाठी शिल्लक उरतो. या प्रदेशातली गावे ओसाड वाळवंटात, झऱ्याच्या काठावर छोट्या छोट्या भागात वसलेली आहेत. पर्यावरण परिसंस्था आणि ऐतिहासिक संदर्भ विचारात न घेता, निष्काळजी मानवी हस्तक्षेप आणि जागतिक हवामान बदलाने या क्षेत्रावर विशेषतः अती उंचावर तापमान वाढीच्या वाढत्या दराने मोठाच परिणाम केला आहे.

सध्या हिमालयीन ग्लेशियर वार्षिक काही मीटर पासून दहा मीटर पर्यंत अशा धोकादायक गतीने घटत आहेत. घटते पर्जन्यमान, सरासरी तापमानात वाढ,ग्लेशियर घटून त्याचे पाणी कमी झाल्याने काही हिमालयीन गावे आता ओसाड घरे, कृषी, जमिनीची धूप, यामुळे हळूहळू उजाड होऊ लागली आहेत. यामुळे पाणी टंचाई, इमारतीत कमी तापमान आणि मूळच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचे झालेले रूपांतर आणि त्यामुळे युवकांचे स्थलांतर असे तीन मोठे आधुनिक प्रश्न लडाखमध्ये निर्माण झाले आहेत.

या प्रश्नांची दखल घेण्यासाठी भारत सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाने, हिमालयीन इन्स्टिट्यूट ऑफ अलटरनेटिव्ह, लडाख,(एचआयएएल) यांच्या सहकार्याने नोव्हेंबर 2019 मध्ये लडाखमधल्या आदिवासी समुदायाचा विकास, संशोधन, दस्तावेजीकरण यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या महत्वाच्या प्रकल्पाचा महत्वाचा एक घटक आहे ‘ निर्जन होत चाललेल्या खेड्यांचे हिम स्तूपामार्फत पुनर्वसन’. हा प्रकल्प म्हणजे स्थानिक जनता, संस्था आणि या भागातील ज्ञान, स्वयंसेवी संस्था आणि सरकार यांच्या सहकार्यात्मक आदर्श प्रयत्न ठरला आहे.

पहिल्या प्रोटो टाईप स्तुपाची कल्पना SECMOL शाळेत 2013 च्या हिवाळ्यात करण्यात आली. प्राचीन प्रथांपासून प्रेरणा घेत आणि चेवांग नोर्फेल यांच्या कृत्रिम ग्लेशियरवरच्या कार्यातून लडाख मध्ये विविध ठिकाणी हिम स्तूप उभारण्यात आले. आदिवासी विकास मंत्रालय आणि SECMOL यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रकल्प आणि आणि ग्लेशियर ग्राफ्तिंग काळ यांची प्रगती झाली आहे. 2013-14 मध्ये एका खेड्यात हिम स्तूप होता. ज्ञान, जागृती आणि संरचना उभारणीची कला यातून 2019-20 मध्ये लडाख मध्ये 26 ठिकाणी असे स्तूप उभारले गेले.

वाढते सहाय्य, कल्पना आणि समविचारी व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून तांत्रिक सहाय्य यातून भारतात आणि परदेशातही हिम स्तूप उभारण्याच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा झाली. 2019-20 च्या हिवाळ्यात 250 ग्राम स्तरावरच्या संबंधीताना प्रकल्पाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. यासंदर्भात लडाख मध्ये विविध कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे आणि वृक्षारोपण मोहिमे द्वारे जागृती करण्यात आली. या वर्षी हिवाळ्यात प्रकल्प आणि सहभागी गावकर्यांना सुमारे 75 दशलक्ष लिटर पाणी वाचवणे शक्य झाले.

पहिला लडाख आईस क्ल्यामबिंग महोत्सव या सारख्या पर्यावरण पूरक पर्यटन घडामोडीतून स्थानिक युवकांना इको- उद्योजकतेची संधी मिळाली.

यावर्षी, कुलुम या गावातून प्रकल्पाला सुरूवात झाली. लेहच्या दक्षिण-पूर्वेला 50 किमीवर वसलेले हे गाव दोन वस्त्यात विभागले आहे, वरचे आणि खालचे कुलुम, यात अनुक्रमे 7 आणि 4 कुटुंबे आहेत. वरच्या खोऱ्यात हिमाच्छादन कमी झाल्यामुळे वरच्या कुलममधली कुटुंबे जवळच्या उपशी शहरात गेल्याने 2012 मध्ये हा भाग पूर्णपणे ओसाड झाला. रहिवासी त्यांची पारंपारिक शेती सोडून रोजंदारी मजूर म्हणून काम करत आहेत किंवा दुकाने चालवत चालवत आहेत. नोव्हेंबर 2019 पासून चार महिने म्हणजे फेब्रुवारी 2020 पर्यंत या 4 महिन्यांच्या कालावधीत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली. अंमलबजावणीपूर्वी, सर्वेक्षण आणि मापन करण्यात आले आणि आराखडा आखण्यात आला. त्यानंतर गरजा जाणण्यासाठी आणि त्यांच्या कल्पना प्रकल्पात समाविष्ट करण्यासाठी गाव आणि समुदाय स्तरावर बैठका घेण्यात आल्या. ही योजना ग्रामस्थांनी चालविली आणि त्यांच्या भूमिका निश्चित करण्यात आल्या, ज्यामुळे या प्रकल्पात भागधारकांचा सहभाग राहील आणि कुलुमच्या माजी रहिवाश्यांमध्ये कार्यक्षमता वाढेल.

प्रकल्प अंमलबजावणीच्या पहिल्या टप्य्यात कुलुमच्या रहिवाशांच्या (ज्यांना स्थानिक भाषेत कुलुम्पा म्हटले जाते ) मदतीने उपकरणे स्थापित करणे, हेड वर्क, वाहिन्या टाकणे आणि हिम स्तूपांसाठी घुमट बांधकाम पूर्ण करण्यात आले. यामुळे सर्व संबंधित स्तरावर सक्रिय सहभागासह गावकऱ्याना प्रक्रियेचा अनुभव मिळाला. पुढच्या काही महिन्यांत फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत, वरच्या कुलमच्या वरच्या वाडीने 45 फूट उंच बर्फ स्तूप उभारला. वाहिन्या गोठणे,उपकरणे मोडणे,वाहिन्या फुटणे, लडाख मधल्या हिवाळ्यातल्या तापमानामुळे हेड वर्क मध्ये प्रवाह कमी होणे यासारखी अनेक आव्हाने उद्भवली, परंतु प्रत्येक वेळी त्यावर स्वदेशी तोडगा काढण्यात आला. या वर्षीचा धडा म्हणजे पुढच्या वर्षीची संपदा ठरेल. उभारणीच्या अखेरच्या हंगामापर्यंत बर्फ स्तूपामुळे 3,00,000 लिटर पाणी वाचविण्यात यश आले. एप्रिल अखेरीला हे स्तूप बांधकाम वितळले,परंतु कुलमच्या शेतासाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाले. पाणीटंचाईच्या समस्येचा सामना आणि कल्पक तोडगा याचा या प्रकल्पामधल्या कुलुम्पाच्या गुंतवणूकीवर मोठा प्रभाव पडला.
येत्या काळात जल व्यवस्थापन रणनीती ते समग्र ग्राम पुनर्वसन मॉडेल असा या प्रकल्पाचा विस्तार करण्याची कल्पना आहे. या मॉडेलमध्ये या पैलूंचा समावेश आहे- कार्बन सिंक म्हणून काम करण्यासाठी अप्पर खोऱ्यात वृक्षारोपण आणि पूरा पासून संरक्षण

आधुनिक सिंचन पद्धती ज्या ठिबक सिंचन आणि हायड्रोपोनिक प्रणालींसारख्या जल-केंद्रित नसतात
दैनंदिन वापरासाठी, वारा, सौर, बायोगॅस यासारखे पर्यायी तंत्रज्ञान

प्रतिमा-1 कुलम गावातला 2019-20.च्या हिवाळ्यातला
हिम स्तूप
एप्रिल अखेरीला हे स्तूप बांधकाम वितळले,परंतु कुलमच्या शेतासाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाले. पाणीटंचाईच्या समस्येचा सामना आणि कल्पक तोडगा याचा या प्रकल्पामधल्या कुलुम्पाच्या गुंतवणूकीवर मोठा प्रभाव पडला.
हे स्तूप पर्यटकांचे आकर्षण स्रोत असून दीर्घकाळ पर्यावरणाचे रक्षण करतील. आईस स्तूपांनी केवळ लडाखच्या आदिवासी गावांची तहान भागविण्या बरोबरच गावकऱ्याना त्यांच्या मूळ गावातच कोणतीही किंवा नवीन पारंपारिक उपजीविका करण्यासाठी आर्थिक पुनर्वसन सुकर करत आदिवासी गावकऱ्याना आत्मनिर्भर होण्याचा मार्गही मोकळा केला आहे.
प्रतिमा 2
2019-20 च्या हंगामात लडाखमधला हिम स्तूप. पहिला, दुसरा आणि तिसरा सर्वात मोठा हिम स्तूप, इगू, टार्चीतआणि फ्यांग या गावातला. शेवटच्या प्रतिमेमध्ये बर्फ खोरे प्रोटोटाइप प्रकल्पादरम्यान बांधलेला बर्फ स्तूपांचा साठा दर्शविला गेला आहे. नंतर नदीकाठची गावे आणि लेह शहरासाठी पाणीपुरवठा होईल.

(सोनम वांगचुक प्रसिद्ध भारतीय अभियंता, कल्पक शिक्षण सुधारक आणि एचआयएएलचे संस्थापक सदस्य आहेत. लडाखच्या स्तुदन स्टुडन एजुकेशनल, कल्चरल मुव्हमेंटचे ते संस्थापक-संचालक आहेत)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close