देश विदेशमहाराष्ट्र

महापुराबाबत महाराष्ट्र – कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय

राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पूरस्थितीची केली पाहणी

इचलकरंजी : २०१९ मध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल घेत, महापूरा साठीच्या नियोजनाबाबत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यातील प्रमुख मंत्री यांच्यामध्ये ८ जुलै २०२० रोजी मुंबई येथे बैठक संपन्न झाली होती, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कर्नाटक राज्याचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी व दोन्ही राज्यांमधील पाटबंधारे विभागाचे अधिकारी व प्रमुख उच्चस्तरीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीमध्ये २०१९ मध्ये आलेल्या महापुराचा आढावा व संभाव्य महापुराबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत चे नियोजन निश्चित केले होते, मागील चार दिवस झाले महाराष्ट्राच्या प्रमुख धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या कोल्हापूर सांगली भागात महापूराची परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे, यामुळे शनिवारी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी शनिवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे एकत्र येऊन पंचगंगा नदीची पाणी पातळी व नदी काठावरील पूरपरिस्थिती बाबत सद्यस्थितीची माहिती घेतली,
पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्र व कर्नाटक मधील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत बोरगांव येथे आढावा बैठक घेतली, दोन्ही राज्याकडून सध्या समन्वय राखला जात आहे, यापुढे तो कायम ठेवावा असे उपस्थित अधिकाऱ्यांना मंत्री जारकीहोळी व महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आदेश दिले, पुढील काळासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या,सध्या महाराष्ट्रामधील प्रमुख धरणांमधून १.५६००० क्यूसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कर्नाटक मधील आलमट्टी या प्रमुख धरणांमधून २.२०००० क्युसेक्स घनमीटर पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती आढावा बैठकीमध्ये दोन्ही राज्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली,
महापुरामुळे दोन्ही राज्यांमधील गावांना व जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये त्याचबरोबर त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना मंत्री जारकीहोळी व राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या,.
यावेळी चिक्कोडी मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्किरे, बेळगाव चे जिल्हाधिकारी आर.जे.हिरेमठ, बेळगाव चे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, प्रांताधिकारी रविंद्र करलींग, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोजकुमार नाईक, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी. डी. पाटील, चिकोडी चे तहसीलदार एस. संपगावी, यांच्यासह प्रांताधिकारी विकास खरात शिरोळ च्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, पाटबंधारे विभागाचे अभियंता शिरीष पाटील, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील, नायब तहसीलदार सनदी मॅडम, बोरगावचे उत्तम पाटील, अभिनंदन पाटील संजय नांदणे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close