सांगली

कोविड रूग्णांवर उपचारासाठी आदित्य हॉस्पिटल, दुधणकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल,शेख हॉस्पीटल उपलब्ध : महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस

८ ऑगस्ट पासून रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांवर उपचार चालू करण्याचे आदेश

सांगली, दि. 8 : कोरोना आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात सुध्दा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक काम सुरू आहे. सद्यस्थितीत रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णांवर उपचार करण्यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी डॉ. शरद सावंत यांचे आदित्य हॉस्पीटल, विश्रामबाग सांगली, डॉ. महेश दुधणकर यांचे दुधणकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, संजयनगर, सांगली व डॉ. अब्दुलनईम अब्दुलरहिमान शेख यांचे शेख हॉस्पीटल, झारी बाग, मिरज या तिन्ही हॉस्पीटलमधील 100 टक्के खाटा कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी तात्काळ आरक्षित केल्या आहेत. तसेच शनिवार, दि. 8 ऑगस्ट 2020 पासून रूग्णालयामध्ये कोविड रूग्णांवर उपचार चालू करण्यात यावेत, असे आदेश महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी जारी केले आहेत.
सद्यस्थितीत रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रूग्णावर उपचार करण्यासाठी जी रूग्णालये बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट (अमेंडमेंट) 2005 अंतर्गत नोंदणीकृत आहेत, अशा खाजगी हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोविड रूग्णांवर उपचार होणे अपेक्षित आहेत. आदित्य हॉस्पीटल, विश्रामबाग सांगली, दुधणकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, संजयनगर, सांगली व शेख हॉस्पीटल, झारी बाग, मिरज ही खाजगी रूग्णालये बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट (अमेंडमेंट) 2005 अंतर्गत सूचीबध्द आहेत. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सदर आदेश जारी केले आहेत.
शनिवार, दि. 8 ऑगस्ट 2020 पासून रूग्णालयांमध्ये कोविड रूग्णांवर उपचार चालू करण्यात यावेत. त्यासाठी डीएमईआर व डीएचएस विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई मार्फत निर्गमित केलेल्या उपचार प्रणालीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून उपचार करण्यात यावेत, असे आदेश महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत.
या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कामात हजगर्जीपणा किंवा टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार आणि Section 2(a)(iii) Maharashtra Essential Services Maintenance Act 2005 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच सदर रूग्णालयाच्या आस्थापनेवर कार्यरत सर्व कर्मचारी कर्तव्य ठिकाणी उपस्थित राहून कर्तव्य बजावत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरूध्द वरील कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, असे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close