माजी जिल्हा परिषद सदस्या भारती गुरव यांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

भिलवडी : भिलवडी व परिसरातील दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्या भारती शहाजी गुरव यांनी दिनांक 07/0 8 /2020 रोजी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून केला. तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत भारती शहाजी गुरव यांनी केले. तसेच त्यांनी कोणतेही यश संपादन करत असताना योग्य दिशेने केलेली परिश्रमपूर्वक केलेली वाटचाल हेच यशाचे मार्ग निर्माण करते असे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुन्या म्हणून जयश्री यशवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आलेली कुमारी आदिती मिलिंद कुलकर्णी राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय,नागठाणे. द्वितीय आलेली कुमारी ऐश्वर्या अरुण गुरव कर्मवीर भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आष्टा तसेच सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या दहावी बोर्ड परीक्षेतील अनुक्रमे कुमारी तनया अजय चौगुले, कुमारी सिद्धी जाबुवंत साळुंखे, कुमारी समृद्धी अनिल सुरवसे, इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलचे विद्यार्थी कुमारी पूर्वा सुनील कुलकर्णी, कुमार हर्ष दीपक पाटील, कुमार पृथ्वीराज संजय पाटील, बारावी शास्त्र सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी अनुक्रमे कुमारी वैष्णवी शंकर पाटील, कुमारी साक्षी राजेंद्र जाधव, कुमार रोहित सतीश जाधव या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्टील फ्रेम, यशराज यासारखी पुस्तके, मास्क, अभिनंदन पत्र, गुलाब पुष्प देऊन जयश्री यशवंत पाटील माजी संचालिका वसंतदादा शेतकरी साखर कारखाना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये कुमारी आदिती कुलकर्णी, कुमारी ऐश्वर्या गुरव कुमारी साक्षी जाधव, कुमारी वैष्णवी पाटील यांनी या कार्यक्रमामुळे आमच्या कष्टाचे फळ मिळाले व भावी आयुष्याच्या दृष्टीने वाटचालीस योग्य दिशा मिळाली व असेच यश संपादन करू असे सांगितले.
कविवर्य सुभाष कवडे सर यांनी विद्यार्थ्यांना भविष्याची वाटचाल करत असताना सध्याच्या यशाला हुरळून न जाता भावी वाटचालीत योग्य ध्येय ठेवून पुढील यश संपादन करावे तसेच विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाचन करावे व आपला बौद्धिक विकास साधावा असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच शहाजी गुरव, संभाजी नाना सुर्यवंशी, बाळासाहेब पाटील, विद्यार्थ्यांचे आई-वडील, आजी-आजोबा उपस्थित होते. आभार प्रमोद गुरव यांनी मानले.