महाराष्ट्रसांगली

जिल्हा परिषद सांगली, जिल्हा नियोजन समिती सांगलीतर्फे भिलवडी, ब्रम्हनाळला यांत्रिक बोटी प्रदान

भिलवडी : जिल्हा परिषद सांगली व जिल्हा नियोजन समिती सांगली (जिल्हा वार्षिक योजना नावीन्यपूर्ण) अंतर्गत भिलवडी व ब्रम्हनाळ या गावासाठी १६+२ प्रवाशी क्षमतेची फायबर ग्लास यांत्रिक बोट भिलवडी ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात आली. या कामासाठी खासदार संजय काका पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेद्र भैय्या वाळवेकर यांनी चांगले प्रयत्न केले.

बोटीबरोबर *बोट टेलर -१, लाईफ जॅकेट -२५ , लाईफ रिंग -५ , लाकडी ओर्स(वल्हे) -४ , लोखंडी कलय -४, लोखंडी अँकर – १, १०० फूट नॉयलॉन दोरी* आदींचा समावेश आहे. बोटीचे पूजन भिलवडी महिला ग्रामपंचायत सदस्या ह्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. भिलवडीतील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बोटीचे पूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेद्र भैय्या वाळवेकर, पलूस पंचायत समिती सभापती दीपक मोहिते , सरपंच विजय आण्णा चोपडे, उपसरपंच चंद्रशेखर केंगार, ग्रा.प. सदस्य संग्राम दादा पाटील,ग्रा.प. सदस्य मन्सूर मुल्ला,भिलवडी व्यापारी संघटना अध्यक्ष रमेश दादा पाटील , क्रांती साखर कारखाना संचालक महावीर चौगुले , दक्षिण भाग सोसा. चेअरमन बाळासो काका मोहिते, उत्तर भाग सोसा. चेअरमन संभाजी सुर्यवंशी, विजय पाटील, डॉ.महेश पाटील सदस्य तानाजी भोई, बाबासो मोहिते , शिवाजी पाटील गुरुजी, संभाजी महिंद , महिला ग्रामपंचायत सदस्या , ग्रामविकास अधिकारी आर. डी. पाटील , तलाठी गौस मोहमद लांडगे व भिलवडी गावातील ज्येष्ठ नागरिक व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close