सांगली

भिलवडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मागासवर्गीयांमध्ये प्रथम आलेल्या मयुरी मानेचा देखील करणार सन्मान
भिलवडी : भिलवडी तालुका पलूस येथे नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ठ गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भिलवडी येथील युवा नेते प्रतिक (दादा) पाटील यांनी संबंधित विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना शालेय साहित्य भेट स्वरुपात देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
राजू (दादा) पाटील व संग्राम (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या भिलवडी येथील तरूणांनी नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या भिलवडी स्टेट बँक परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र उर्फ बाबा शिंदे यांच्या वतीने प्रतिक (दादा) पाटील यांच्या हस्ते शुभेच्छा पत्र, गुलाब पुष्प तसेच शालेय साहित्य देवून सन्मानित केले.प्रतिकुल परिस्थिती मध्ये देखील अडीअडचणी वर मात करून सेकंडरी स्कूल भिलवडी केंद्रामध्ये ९५. २० टक्के गुण मिळवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेली मयुरी तुकाराम माने व १०० टक्के गुण मिळवून अव्वल आलेली तनया अजय चौगुले यांचा देखील त्यांच्या घरी जाऊन सन्मान करणार असल्याचे मत प्रतिक पाटील व राजेंद्र उर्फ बाबा शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी भिलवडीचे युवा नेते प्रतिक (दादा) पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र उर्फ बाबा शिंदे,माजी उपसरपंच श्रीकांत गायकवाड, रणजित शिंदे,प्रकाश गडदे,श्रीराम केळकर, संजय मांडवे,चेतन शिंदे, संदिप कोरे, पाशा आत्तार,अनिल हजारे, अमित गायकवाड व बशीर आत्तार उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close