ताज्या घडामोडी

भिलवडी : भिलवडी पोलीस स्टेशन तर्फे हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, दि. 05/8/2020 रोजी आयोध्येत श्री राम मंदिराचे पायाभरणीचा कार्यक्रम होत आहे. तरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सोशल मिडीयावर जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, चित्रफीत , अफवा, खोट्या बातम्या सोशल मिडायात व्हायरल करु नयेत ग्रुप अँडमिनने ग्रुप मधील सदस्याना सुचना द्याव्यात ग्रुप सेंटिग बदलुन फक्त अँडमिन मेसेज पाठविल अशी व्यवस्था करावी अन्यथा ग्रुप अँडमिन व संबधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी तसेच हद्दीतील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, राममंदीर भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणीही सार्वजनिक कार्यक्रम घेवू नये . साखर , पेढे , लाडू , मिठाई यांचे वाटप करू नये. कोणत्याही धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. असा कोणताही प्रकार निदर्शनास आलेस संबधितावर कायदेशीर कारवाई करणेत येईल याची नोंद घ्यावी. 🚨🚨*

( कैलास जे. कोडग )
सहायक पोलीस निरीक्षक
भिलवडी पोलीस स्टेशन

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close