
पलूस तालुक्यातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम साहेबांनी भिलवडी गावातील लोकांची विचारपूस केली. यावेळी मंत्री महोदयांनी कंनटेन्मेंट झोन मधील लोकांना अत्यावश्यक सेवा तसेच दैनंदिन गरजेचे साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या. मेडिकल ऑफीसर,आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तलाठी, ग्रामसेवक व कोरोनाच्या या लढाईत काम करणाऱ्या सर्वांची आपुलकीने चौकशी मंत्री महोदयांनी केली.
या वेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी,गावातील दक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
⬆⬆
Share