महाराष्ट्रसांगली

जत तालुक्यात जत शहर व मुचंडी व बाज, येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

सांगली, दि. 28 : जत तालुक्यातील जत शहर व मुचंडी व बाज येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जत उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली.
कंटेनमेंट झोन जत शहरामधील शंकर कॉलनी परिसर – उत्तरेकडे नवनाथ बामणे यांचे घरापर्यंत, पूर्वेकडे सुरेश भंगे यांचे प्लॉटपर्यंत, दक्षिणेकडे नगरपरिषद जत यांचे मालकीचे प्लॉटपर्यंत, पश्चिमेकडे महादेव कोळी समाज मंदीरापर्यंत. बफर झोन – उत्तरेकडे एच डी एफ सी बँकेपर्यंत, पार्वतीनगर परिसराचे पूर्वेकडे शंकर कॉलनीमधील मलाप्पा शंकर माळी यांचे प्लॉटपर्यंत, दक्षिणेकडे कोरे मळा रस्त्यापर्यंत, पश्चिमेकडे प्रतिक सिनेमा गृहापर्यंत.
कंटेनमेंट झोन जत शहरामधील कोठावळे गल्ली व आष्टेकर गल्ली परिसर – उत्तरेकडे आरबळी यांचे दुकानापर्यंत, पूर्वेकडे जत उमराणी रस्त्यालगत वासुदेव साळुंखे यांचे घरापर्यंत, दक्षिणेकडे धानाप्पा कोठावळे यांचे घरापर्यंत, पश्चिमेकडे बसवेश्वर मंदीरापर्यंत. बफर झोन – उत्तरेकडे एच डी एफ सी बँकेपर्यंत, पार्वतीनगर परिसराचे पूर्वेकडे शंकर कॉलनीमधील मलाप्पा शंकर माळी यांचे प्लॉटपर्यंत, दक्षिणेकडे कोरे मळा रस्त्यापर्यंत, पश्चिमेस प्रतिक सिनेमा गृहापर्यंत.
कंटेनमेंट झोन जत शहरामधील विद्युत नगर परिसर – उत्तरेकडे जत हायस्कूल रस्त्यालगत दऱ्याप्पा पाटील यांचे घरापर्यंत, पूर्वेकडे शाहीद उगारे यांचे घरापर्यंत, दक्षिणेकडे चंद्रकांत कुंभार यांचे घरापर्यंत, पश्चिमेकडे बसवराज अंगडी यांचे घरापर्यंत. बफर झोन – उत्तरेकडे लक्ष्मण कोळी यांच्या घरापर्यंत, पूर्वेकडे बंडू इराप्पा माळी यांच्या घरापर्यंत, दक्षिणेकडे चंद्रकांत कुंभार यांच्या घरामागील मोकळ्या जागेपर्यंत, पश्चिमेकडे करीम मुजावर यांच्या घरापर्यंत.
कंटेनमेंट झोन मुचंडी कांबळे गल्ली परिसर – उत्तरेस बीएसएनएल टॉवरपर्यंत, पूर्वेस जिल्हा परिषद कन्नड शाळेपर्यंत, दक्षिणेस दोन नबंर पाझर तलावापर्यंत, पश्चिमेकडे ग्रामपंचायतची गायरान जमीनीपर्यंत. बफर झोन – उत्तरेस महेश पोलेसी यांचे जमीनीपर्यंत, पूर्वेस बाबू भावीकट्टी यांचे जमीनीपर्यंत, दक्षिणेस शामराव काटे जमीनीपर्यंत, पश्चिमेस मुचंडी रावळगुंडवाडी रस्त्यालगत बाबू हिरगोंड यांचे घरापर्यंत.
कंटेनमेंट झोन बाज कोरे गल्ली परिसर – उत्तरेस अब्दुल मुजावर यांचे घरापर्यंत, पुर्वेस डिलक्स यांचे बारपर्यंत, दक्षिणेस ग्रामपंचायम समोरील सभा मंडपापर्यंत, पश्चिमेस महादेव कोळी समाज मंदीरा पर्यंत. बफर झोन – उत्तरेकडे बाज दुध संकलन केंद्रापर्यंत, पुर्वेकडे सुलतान पीर गायकवाड दर्ग्यापर्यंत, दक्षिणेकडे कोरे बाज डफळापूर रस्त्यावरील कॅनालपर्यंत, पश्चिमेकडे छबाताई रामा गडदे यांचे घरापर्यंत.
सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जत उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close