महाराष्ट्रसांगली

कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

सांगली, दि. 23 : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी व मिरज तालुक्यातील बिसुर, गुंडेवाडी, पद्माळे, समडोळी, कर्नाळ, तुंग, नांद्रे व अंकली येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
कंटेनमेंट झोन केरेवाडी – पुर्वेस गट नं. 253 ते गट नं. 181, पश्चिमेस गट नं. 193 ते गट नं. 248, दक्षिणेस गट नं. 181 ते गट नं. 193, उत्तरेस गट नं. 248 ते गट नं. 253. बफर झोन – पूर्वेस गट नं. 238 पासून गट नं. 181 पर्यंत केरेवाडी ते आगळगाव रस्ता 200 मी, पश्चिमेस गट नं 284 ची हद्द ते गट नं. 272 ची हद्द 200 मी., दक्षिणेस गट नं 181 ते केरेवाडी ते आगळगाव रस्ता ते गट नं 284 ची हद्द 200 मी., उत्तरेस गट नं 272 ची हद्द ते गट नं. 238 ची हद्द केरेवाडी ते आगळगाव रस्त्यापर्यंत.
कंटेनमेंट झोन अंकली – पुर्वेस अशोक रघुनाथ गळगे यांचे घर ते ग्रामपंचायत इमारत, पश्चिमेस सुरेश भिमगोंडा पाटील यांचे घर ते रामगोंडा येतगोंडा पाटील यांचे घर, दक्षिणेस रामगोंडा येतगोंडा पाटील यांचे घर ते अशोक रघुनाथ गळगे यांचे घर, उत्तरेस ग्रामपंचायत इमारत ते सुरेश भिमगोंडा पाटीलल यांचे घर. बफर झोन – पुर्वेस जुनी धामणी रस्ता ते विनायक जाधव कोलप यांची शेती, पश्चिमेस रेल्वे मार्ग ते सातगोंडा सिदगोंडा पाटील यांची शेती, दक्षिणेस सातगोंडा सिदगोडा पाटील यांची शेती ते जुनी धामणी रस्ता, उत्तरेस विनायक जाधव कोलप यांची शेती ते रेल्वे मार्ग.
कंटेनमेंट झोन नांद्रे – पुर्वेस शांतीनाथ वजाळे घर ते गुणवंत कुरणे घर, पश्चिमेस गुणवंत कुरणे घर ते अशोक कांबळे घर, दक्षिणेस अशोक कांबळे घर ते अनिल भिलवडे घर, उत्तरेस अनिल भिलवडे घर ते शांतीनाथ वंजाळे घर. बफर झोन – पुर्वेस शशिकांत वाले घर ते मिरासो कुरणे घर, पश्चिमेस मिरासो कुरणे घर ते दिपक शंकर सादरे शेती, दक्षिणेस दिपक शंकर सादरे शेती ते अनिल भिलवडे घर, उत्तरेस अनिल भिलवडे घर ते शशिकांत वंजाळे घर.
कंटेनमेंट झोन बिसुर – पुर्वेस सयाजी नामदेव पाटील यांचे घर व आप्पासो बाबुराव निकम यांचे घर, पश्चिमेस उत्तम सिताराम पाटील यांचे घर व सदाशिव भाऊ पाटील यांचे घर, दक्षिणेस शशिकांत सिताराम कांबळे यांचे घर व बळवंत सदाशिव पाटील यांचे घर, उत्तरेस बबन (पिराजी) हिंदुराव पाटील यांचे घर. बफर झोन – पुर्वेस आनंद गोपाळ जोशी यांचे घर, पश्चिमेस गणपती शामराव पाटील यांचे घर, दक्षिणेस भुपाल बाबु कांबळे यांचे घर व ओढापात्र, उत्तरेस गणपती मंदीर व बिसुर खेातवाडी रस्ता.
कंटेनमेंट झोन गुंडेवाडी – पुर्वेस एरंडोली गुंडेवाडी रस्ता, पश्चिमेस आण्णासो तुकाराम पाटील यांचे किराणा दुकान, दक्षिणेस किसन नायकु यंगारे यांचे राहते घर, उत्तरेस मिरज गुंडेवाडी मुख्य रस्ता. बफर झोन – पुर्वेस सदाशिव गुरूबसाप्पा कोष्टी यांची शेतजमीन, पश्चिमेस ओढा पात्र मौजे मालगाव शिव, दक्षिणेस बाबासो घोदे यांचे राहते घर व गुंडेवाडी – मल्लेवाडी, उत्तरेस शिवाजी केरू पाटील यांची शेतजमीन.
कंटेनमेंट झोन पद्माळे – पुर्वेस दिनकर शंकर जगदाळे घर ते रावसाहेब सावंत घर, पश्चिमेस गट नं. 381 व मळी रस्ता, दक्षिणेस बाबासो पाटील घर ते गट नं 381, उत्तरेस करीम घर ते यादव दुकान. बफर झोन – पुर्वेस भानुदास सावंत घर ते अशोक कोळी घर, पश्चिमेस कृष्णा नदी ते तांबोळी घर, दक्षिणेस बबन कांबळे घर ते राजेंद्र पाटील घर, उत्तरेस सावंत वस्ती व गट नं. हद्द.
कंटेनमेंट झोन समडोळी – पुर्वेस आदगोंडा जनगोंडा पाटील घर / चंद्रकांत भूजाप्पा खोत, पश्चिमेस राजेंद पायगोंडा पाटील घर / आष्टा बँक, दक्षिणेस चंद्रकांत लक्ष्मण कोष्टी घर, उत्तरेस बाहुबली महावीर पाटील घर / ग्रामपंचायत कार्यालय. बफर झोन – पुर्वेस पद्मावती कॉलनी, पश्चिमेस शांतीसागर कॉलनी, दक्षिणेस गर्ल्स व बॉईज हायस्कूल, उत्तरेस सांगली – कवठेपिरान रस्ता.
कंटेनमेंट झोन कर्नाळ – पुर्वेस सांगली कर्नाळ रस्ता, पश्चिमेस गट नं. 567 ब ते सांगली कर्नाळ रस्ता, दक्षिणेस गट नं. 567 ब ते सांगली कर्नाळ रस्ता, उत्तरेस गट नं. 565 ते सांगली कर्नाळ रस्ता. बफर झोन – पुर्वेस भवानीनगर ते विठ्ठलनगर, पश्चिमेस वृंदावन कॉलनी ते गट नं. 570, दक्षिणेस गट नं 570 ते विठ्ठलनगर, उत्तरेस वृंदावन कॉलनी ते भवानीनगर.
कंटेनमेंट झोन तुंग – पुर्वेस रामचंद्र शंकर केडगे (मिळकत क्र. 1049), पुर्वेस ईशान्य – बाजीराव बाळकृष्ण भानुसे (मिळकत क्र. 1059), दक्षिणेस सुलोचना दत्तात्रय पाटील (मिळकत क्र. 1071), उत्तरेस बाळासो शंकर कदम (मिळकत क्र. 1065). बफर झोन – पुर्वेस बाबु परसु सुर्यवंशी (मिळकत क्र. 1086), पश्चिमेस बाळासो शंकर कदम (मिळकत क्र. 1065), दक्षिणेस विष्णु मारूती निगवेकर (मिळकत क्र. 1073), उत्तरेस सिंधुताई राजाराम चव्हाण (मिळकत क्र. 869).
सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close