बांबवडे, माळवाडी, तडसर येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात
सांगली, दि. 23: पलुस तालुक्यातील बांबवडे व माळवाडी तसेच कडेगाव तालुक्यातील तडसर येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली.
कंटेनमेंट झोन बांबवडे – (1) कंटेनमेंट झोन – उत्तरेस लक्ष्मण पांडुरंग सुर्वे ग.नं. 370 क्षेत्र ते जुना सातारारोड, पूर्वेस राजाराम आकाराम सुर्वे ते ग.नं. 371 क्षेत्र त लक्ष्मण पांडुरंग सुर्वे ग.नं. 370 क्षेत्र, दक्षिणेस राजाराम शंकर पाटील ग.नं. 372 क्षेत्र ते राजाराम आकाराम सुर्वे ते ग.नं. 371 क्षेत्र, पश्चिमेस जुना सातारारोड ते राजाराम शंकर पाटील ग.नं. 372 क्षेत्र. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटंेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन – पूर्वेस अशोक विठ्ठल खंबाळकर यांचे घर ते बजरंग शामराव कदम यांचे क्षेत्र, उत्तरेस बजरंग शामराव कदम यांचे क्षेत्र ते रघुनाथ आत्माराम पवार ग.नं. 186, पश्चिमेस रघुनाथ आत्माराम पवार ग.नं. 186 ते ज्ञानू कृष्णा पवार यांचे क्षेत्र, दक्षिणेस ज्ञानू कृष्णा पवार यांचे क्षेत्र ते अशोक विठ्ठल खंबाळकर यांचे घर. (2) कंटेनमेंट झोन – उत्तरेस सुरेश सिदू भंडारे यांचे घर ते शोभा शिवाजी भंडारे घर, पूर्वेस विनोद हणमंत भंडारे घर ते कमलाकर सायाप्पा भंडारे, दक्षिणेस कमलाकर सायाप्पा भंडारे घर ते विनोद हणमंत भंडारे घर, पश्चिमेस शोभा शिवाजी भंडारे घर ते कमलाकर सय्याप्पा भंडारे घर. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटंेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन – पूर्वेस अनिल आनंदराव पवार यांचे घर ते ताहीर गुलाब मुल्ला यांचे घर, उत्तरेस ताहेर गुलाब मुल्ला यांचे घर ते विठ्ठल भाऊ कदम घर, पश्चिमेस विठ्ठल भाऊ कदम घर ते विजय विष्णू जाधव घर, दक्षिणेस विजय विष्णू जाधव घर ते अनिल आनंदराव पवार घर. (3) कंटेनमेंट झोन – उत्तरेस शंकर नाथा घर ते लक्ष्मण गणपती पवार घर, पूर्वेस भगवान पांडुरंग पवार घर ते शंकर नाथा पवार घर, दक्षिणेस विलास गणपती धुमाळ घर ते भगवान पांडुरंग पवार घर, पश्चिमेस लक्ष्मण गणपती पवार घर ते विलास गणपती धुमाळ घर. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटंेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन – पूर्वेस हणमंत नामदेव सुर्यवंशी यांचे क्षेत्र ते अतुल जगन्नाथ पवार क्षेत्र, उत्तरेस अतुल जगन्नाथ पवार यांचे क्षेत्र ते हणमंत शिदू पवार यांचे घर, पश्चिमेस हणमंत शिदू पवार घर ते दीपक केशव पाटील घर, दक्षिणेस दीपक केशव पाटील घर ते हणमंत नामदेव सूर्यवंशी यांचे क्षेत्र.
कंटेनमेंट झोन माळवाडी – उत्तरेस मारूती दत्तू पुजारी क्षेत्र ते प्रताप आनंदा पुजारी क्षेत्र, पूर्वेस मारूती दत्तू पुजारी घर ते मारूती दत्तू पुजारी क्षेत्र, दक्षिणेस प्रताप आनंदा पुजारी क्षेत्र ते प्रताप आनंदा पुजारी घर, पश्चिमेस प्रताप आनंदा पुजारी घर ते मारूती दत्तू पुजारी घर. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटंेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन – पूर्वेस बागडी समाज सार्वजनिक शौचालय ते संग्राम दादा पाटील यांचे फार्म हाऊस, उत्तरेस संग्राम दादा पाटील यांचे फार्म हाऊस ते गुंडूराव कृष्णा बादल यांचे क्षेत्र, पश्चिमेस गुंडूराव कृष्णा बादल यांचे क्षेत्र ते ताई बाबुराव चव्हाण घर, दक्षिणेस ताई बाबुराव चव्हाण घर ते बागडी समाज सार्वजनिक शौचालय.
कंटेनमेंट झोन तडसर – उत्तरेस बकाळ वस्ती, पूर्वेस कदम वस्ती, दक्षिणेस तडसर शिरसगाव रोड, पश्चिमेस जाधव वस्ती. या स्थलसिमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन – पूर्वेस गायरान जमीन, उत्तरेस स्मशानभूमी, पश्चिमेस गट 1693 ची जमीन, दक्षिणेस गट नंबर 1119 ची जमीन.
सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी दिले आहेत.
00000