हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यास क्रमाच्या प्रथम सत्र प्रवेशासाठी अर्ज करण्यास 6 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
सांगली, दि. 20 : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंंत्रविज्ञान पदविका अभ्यास क्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13 व वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रवेश अर्ज दि. 17 जुलै 2020 पर्यंत मागविण्यात आले होते. आता प्रवेश अर्ज सादर करण्यास 6 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी कळविले आहे.
प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी कळविले आहे.