सांगली

बेरोजगार उमेदवारांनी आधार लिंकसह नाव नोंदणी अद्ययावत करावी : सहायक आयुक्त संजय माळी

सांगली : शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ज्या बेरोजगार उमेदवारांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केलेली आहे, त्यांनी आधार लिंकसह आपली नोंदणी अद्ययावत करावी. तसेच मोबाईल नंबर, ई-मेल आयडी सुध्दा अद्ययावत करून नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
याबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0233-2600554 वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.
00000

स्वयंरोजगारासाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार
सांगली : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र सांगली व शासकीय आय.टी.आय. जत / कवठेमहांकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार इच्छुक युवक युवतींसाठी दिनांक 17 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली.
सदर सेमिनारचा लाभ meet.google.com/syt-rdnp-ozk या गुगल लिंकवरून घेता येईल. या सेमिनारमध्ये ग्रामीण महाराष्ट्रात कोविड नंतरच्या उद्योग व व्यवसाय संधी या विषयावर पयोद इंडस्ट्रिज चे चेअरमन देवानंद लोंढे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ए. बी. तांबोळी व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ इच्छुक युवक युवतींनी घ्यावा, असे आवाहनही संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
0

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close