विचारपुष्प

कुठं आहेत ओ.बी.सी.च्या सामाजिक-राजकीय संघटना?

कुठं आहेत ओ.बी.सी.च्या सामाजिक-राजकीय संघटना?? जाणीवपूर्वक ओ.बी.सी आरक्षण संपवण्याचा गल्ली ते दिल्ली प्रयत्न सुरू आहे. एक ही मायचा लाल राज्य व केंद्र सरकारशी ओ.बी.सी.च्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करताना दिसत नाही. निदान मिळालेलं आरक्षण वाचवण्यासाठी तरी जागे व्हा!! एसीत देवु पाण्यात घालून बसालत तर पुन्हा क्षुद्रतेकडे वाटचाल सुरू झालीच म्हणून समजा.कारण अती क्षुद्रांनी महात्मा फुल्यांचा आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा संजीवनी मंत्र आत्मसात केलेला आहे. त्या मुळे ते संघर्षासाठी कफन बांधून तयारच असतात.पण आपल्या फुगलेल्या-सुजलेल्या निषक्रियेचे काय?? आपल्या कुळाच्या सातपिढयांचा उद्धार झाला म्हणजे एकाजात सगळया ओ.बी.सीं चा उद्धार या भिकिर-टुकार पाखंडी मानसीकतेन जोपर्यंत हे ओ.बी.सीं चे भुरटे बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत ओ.बी.सीं ना योग्य न्याय मिळणार नाही. शेवटी धाकाटयाच्या खंदयावर किती दिवस बंदूक ठेवणार?? शैक्षणिक – सामाजिक हक्कासाठी जर ही अवस्था असेल तर मग राजकीय-धार्मिक हकाचा प्रश्नच मिटला.??? जगाच्या पाठीवर सगळया सोशित – वंचितांमध्ये जागरुकता आली पण आमच्या ओ.बी.सीं चा कर्मकांडाच्या भांगेत सुस्त पडलेला टायगर कांही केल्या जागा होताना दिसत नाही. महात्मा फुले – शाहुमहाराज – डाॅ बाबासाहेब आंबेडकर माफ करा यांना कारण हे सगळे मनूच्या छू मंतर मध्ये अडकलेले आहेत. पुन्हा एकदा मनुवादी यांच्या हाती भिकेचा कटोरा देतील तेंव्हा कदाचित जागे होतील. असो.

-विनायक यादव

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close