महाराष्ट्रसांगली

मिरज तालुक्यातील बामणोली, कवलापूर, बुधगाव व डिग्रज येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

सांगली : मिरज तालुक्यातील बामणोली, कवलापूर, बुधगाव व मौजे डिग्रज येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
कंटेनमेंट झोन बामणोली – 1) राजेंद्र रघुनाथ चव्हाण यांचे घर 2) मीना गणेश चळेकर यांचे घर 3) राजेंद्र किसन बामणे यांचे घर 4) अनिल जगन्नाथ बेंद्रे यांचे घर 5) तानाजी धोंडिराम खोत यांचे घर 6) तुकाराम राघु शेटे यांचे घर.
कंटेनमेंट झोन कवलापूर – 1) पूर्वेस रमेश पाटील घर ते मानसिंग रजपूत घर 2) पश्चिमेस भगवान बाबासो पाटील ते गजानन नलवडे घर 3) दक्षिणेस मानसिंग रजपूत ते भगवान बाबासो पाटील घर 4) उत्तरेस गजानन नलवडे घर ते रमेश पाटील घर.
कंटेनमेंट झोन बुधगाव – 1) पूर्वेस गव्हाणकर यांची जमीन 2) पश्चिमेस सांगली तासगाव रस्ता ते वंसत भाऊ चव्हाण यांची जमीन 3) दक्षिणेस वसंत भाऊ चव्हाण यांची जमीन ते गव्हाणकर यांची जमीन 4) उत्तरेस सुंदर सिद्राम मोरे यांचे घर ते कंदील कट्टा.
कंटेनमेंट झोन डिग्रज – 1) पूर्वेस गट नं. 501/1अ विकास लक्ष्मण पाटील यांची जमीन 2) पश्चिमेस गट नं. 533 बाळलिंग लच्छारामसिंग रजपूत यांची जमीन 3) दक्षिणेस गट नं. 526 प्रदीप माने यांची जमीन 4) उत्तरेस गट नं. 501/1अ विकास लक्ष्मण पाटील यांची जमीन.
बफर झोन बामणोली – 1) कुपवाड गाव हद्द 2) कुपवाड एमआयडीसी हद्द 3) कुपवाड हद्द मिरज एमआयडीसी 4) कुपवाड गाव हद्द.
बफर झोन कवलापूर – 1) पूर्वेस आमराई मळा 2) पश्चिमेस हायस्कूल रोड (पंडीत बापू वाडा रोड) 3) दक्षिणेस पंडीत नेहरू विद्यालयापर्यंत 4) उत्तरेस चावडी कार्यालय समोरील रोड.
बफर झोन बुधगाव – 1) पूर्वेस हरि दादू जाधव यांची जमीन ते सुंदर सिद्राम मोरे यांचे घर 2) पश्चिमेस कंदील कट्टा ते गोविंद पोतदार यांचे गॅरेज 3) दक्षिणेस गोविंद पोतदार यांचे गॅरेज ते हरी दादू जाधव यांची जमीन 4) उत्तरेस सुंदर सिद्राम मोरे यांचे घर ते कंदील कट्टा.
बफर झोन डिग्रज – 1) पूर्वेस सांगली पलूस रस्ता 2) पश्चिमेस गट नं. 494 सरकार जमीन 3) दक्षिणेस सांगली पलूस रस्ता 4) उत्तरेस गट नं. 494 सरकार जमीन.
सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी दिले आहेत.

कवठेमहांकाळ येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यात मौजे कवठेमहांकाळ हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
कंटेनमेंट झोन – 1) पूर्वेस शिंदे गुरूजी यांचे जुने घर ते चंद्रकांत शिंदे यांचे घर ते सुभाष यादव गुरूजी यांच्या घराच्या पश्चिमेकडील परिसर 2) पश्चिमेस हिम्मत पाटील यांचे एन.ए. प्लॉटची खुली जागा ते तुकाराम आबा पाटील यांची दुमजली इमारत ते राम मंदीर कॉर्नरच्या पूर्वेकडील परिसर 3) दक्षिणेस सुभाष यादव गुरूजी यांचे घर ते दत्तात्रय शिवाजी पाटील यांची दुमजली इमारत ते हिम्मत निवृत्ती पाटील यांचे एन.ए. प्लॉटची खुली जागेच्या उत्तरेकडील परिसर 4) उत्तरेस राम मंदीर कॉर्नर ते श्री. महांकाली हायस्कूल चे दक्षिण बाजूचे तारेचे कुंपन ते शिंदे गुरूजी यांच्या घराच्या दक्षिणेकडील परिसर.
बफर झोन – 1) पुर्वेस भूमी अभिलेख कार्यालयाच्या पाठीमागील बिरबल गपाट यांच्या घरासमोरील टॉवर ते जि.प. शाळा नं. 1 च्या पश्चिमेकडील भिंत ते जि.प. शाळा शौचालय ते वाले सिमेंट गोडावूनच्या पश्चिमेकडील परिसर 2) पश्चिमेस संजय शेटे बंगला ते इंद्रायणी बंगला (गणेश पाटील) समोरील अंतर्गत रस्ता ते आण्णासाहेब पाटील बंगला च्या पुर्वेकडील परिसर 3) दक्षिणेस वाले सिमेंट गोडावून ते शशिकांत कोरे यांच्या प्लॉट मधील अंतर्गत रस्ता ते शिवाजी रामचंद्र पाटील यांच्या प्लॉट मधील अंतर्गत रस्ता ते संजय शेटे बंगला च्या उत्तरेकडील परिसर 4) उत्तरेस आण्णासाहेब पाटील बंगला ते राम मंदीर ते श्री. महांकाली हायस्कूलच्या दक्षिणेकडील तारेचे कुंपण ते पंचायत समिती खुली जागा (कंपाऊंड) ते भूमी अभिलेख कार्यालयाच्या पाठीमागील बिरबल गपाट यांच्या घरासमोरील टॉवर.
सदर भागांमध्ये सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश मिरज उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी दिले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close