महाराष्ट्रसांगली

शेतकऱ्यांना केसीसी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम

दूध उत्पादकांनी तात्काळ किसान क्रेडीट कार्ड फॉर्म बँकेत जमा करावेत

सांगली : केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजनेच्या (केसीसी) लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मोहिम दि. 8 फेब्रुवारी 2020 पासून सुरू केलेली आहे. किसान क्रेडीट कार्ड सुविधेची उपयुक्तता व शेतकऱ्यांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद विचारात घेवून शेतकऱ्यांसाठीच्या पंतप्रधान आत्मनिर्भर धोरणांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसह दुग्ध, कुक्कुटपालन व मत्स्य व्यवसायासाठी अल्पमुदती खेळती भांडवली कर्ज पुरवठा किसान क्रेडीट कार्ड सुविधा मार्फत उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार दूध संघ व दूध उत्पादक कंपन्यांचे संलग्न असणाऱ्या शेतकऱ्यांना केसीसी उपलब्ध करून देण्यासाठी दि. 1 जुन 2020 ते 31 जुलै 2020 या कालावधीत विशेष मोहीम सुरू केलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांनी दूध उत्पादकांनी दूध संस्थामार्फत तात्काळ विहीत नमुन्यातील किसान क्रेडीट कार्ड फॉर्म बँकेत जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी केले आहे.
या विशेष मोहिमेंतर्गत सर्व सहकारी दूध संस्था, सहकारी / बहुराज्यीय दूध संघ यांच्या सर्व सभासदांना संबंधित बँकांमार्फत किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) वाटप करावयाचे आहे. सहकारी दूध संस्था / सभासद अथवा ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे किसान क्रेडीट कार्ड नाही त्यांचा समावेश करून त्यांना किसान क्रेडीट कार्ड वाटप करण्यात येत आहे. तसेच ज्या शेतकरी दूध उत्पादकांना यापूर्वीच किसान क्रेडीट कार्ड वितरीत केले आहे, त्यांना किसान क्रेडीट कार्डची कर्ज मर्यादा वाढवून देण्यात येणार आहे. त्या कार्डधारक दूध उत्पादकांना / सभासदांना 2 टक्के व्याज परतावा आणि मुदतीत कर्ज फेडणाऱ्या दूध उत्पादकांना अतिरिक्त 3 टक्के व्याज परतावा मान्य करण्यात आलेला आहे. संघाच्या अधिनस्त असलेल्या प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थांचे सभासद कोणत्या बँकेकडे व शाखेकडे जोडलेले आहेत व त्यांचे किसान क्रेडीट आहे का याची खातरजमा करण्यात येणार आहे.
संघ व प्राथमिक दूध संस्थामाफत शेतकरी सभासदांकडून फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया चालू असून सभासदांकडील फॉर्म संबंधित बँकेच्या शाखेकडे जमा करण्यात येत आहेत. ज्या उत्पादक सभासदांचे विकास सेवा संस्था किंवा जिथे पीक कर्ज खाते आहे तेथे, भुमीहीन दूध उत्पादक सभासदांनी ज्या ठिकाणी बँक खाते तेथेच अर्ज सादर करावा. त्याचप्रमाणे दूध संघाने सदर सभासदाकडे किती जनावरे आहेत व तो सभासद दूध संस्थेस / संघास किती दूध पुरवठा करतो याचे प्रमाणपत्र देवून सदर दूधाचे पेमेंट डी.बी.टी. मार्फत त्यांच्या फॉर्ममध्ये नमूद खात्यात जमा करण्यात येते हे प्रमाणित करणे आवश्यक आहे. सर्व बँकांनी दूध उत्पादक / सभासदांचे अर्ज तात्काळ दाखल करून घेण्याबाबत व त्यांच्या अधिनस्त सर्व बँक शाखेंनी अर्ज दाखल करून अर्ज प्राप्त झाल्यापासून कमाल 14 दिवसांत कार्यवाही करण्यात यावी असे कळविण्यात आल्याचे जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close