जत तालुक्यात बिळूर, मेंढेगिरी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 6 : जत तालुक्यात बिळूर येथील कंठी मलव्वा हद्दीत, धोडमाळ वस्ती, मेंढेगिरी येथील गावठाण हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन बिळूर येथील कंठी मलव्वा येथील – 1) बिळूर गावाच्या बुध्दीमठ वस्ती परिसराच्या उत्तरेकडे वसंत दत्तात्रय पोतदार यांच्या जमीनीपर्यंत 2) बिळूर गावाच्या बुध्दीमठ वस्ती परिसराच्या पूर्वेकडे बिळूर खोजनवाउी रस्त्यालगत रावसो भिमाण्णा बिरादार यांच्या जमीनीपर्यंत 3) बिळूर गावाच्या बुध्दीमठ वस्ती परिसराच्या दक्षिणेकडे आकबर आप्पासो उमराणी यांच्या जमीनीपर्यंत 4) बिळूर गावाच्या बुध्दीमठ वस्ती परिसराच्या पश्चिमेकडे आण्णाजी भाऊराव कुलकर्णी यांच्या जमीनीपर्यंत. या स्थलसिमामध्ये कंटेनमेंट झोन अधिसूचित केले आहे.
कंटेनमेंट झोन बिळूर येथील धोडमाळ वस्ती येथील – 1) बिळूर गावाच्या धोडमाळ वस्ती परीसराच्या उत्तरेकडे बळगारी दऱ्याप्पा रूपनावर यांच्या जमीनीपर्यंत 2) बिळूर गावाच्या धोडमाळ वस्ती परीसराच्या पूर्वेकडे बसवराज बाळकृष्ण कुंभार यांच्या जमीनीपर्यंत 3) बिळूर गावाच्या धोडमाळ वस्ती परीसराच्या दक्षिंणेकडे बसवराज शिवाप्पा धोडमाळ यांच्या द्राक्ष बागेपर्यंत 4) बिळूर गावाच्या धोडमाळ वस्ती परीसराच्या पश्चिमेकडे पिरगोंडा बसाप्पा कोळी यांच्या जमीनीपर्यंत. या स्थलसिमामध्ये कंटेनमेंट झोन अधिसूचित केले आहे.
बफर झोन बिळूर – 1) बिळूर गावाच्या परिसराच्या उत्तरेकडे जत बिळूर रस्त्यालगत यशवंत नानासो चव्हाण यांच्या जमीनीपर्यंत 2) बिळूर गावाच्या परिसराच्या पूर्वेकडे बिळूर खोजनवाडी रस्त्यालगत गोपाळ संगाप्पा बसर्गी यांच्या जमीनीपर्यंत 3) बिळूर गावाच्या परिसराच्या दक्षिणेकडे जत अथणी रोडलगत बसाप्पा रामन्ना आरगोडी यांच्या जमीनीपर्यंत 4) बिळूर गावाच्या परिसराच्या पश्चिमेकडे बिळूर जिरग्याळ रस्त्यालगत मिरासो लालू बसर्गी यांच्या जमीनीपर्यंत.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.