ताज्या घडामोडी
करिअर मार्गदर्शन व रोजगार स्वयंरोजगार संधी विषयावर 6 जुलै रोजी सेमिनार : सहाय्यक आयुक्त एस. के. माळी
सांगली : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सांगली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारासाठी करिअर मार्गदर्शन व रोजगार स्वयंरोजगार संधी या विषयावर सेमिनार दिनांक 6 जुलै 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत आयोजित केले आहे. या वेब सेमिनारचा लाभ meet.google.com/gfo-gxid-bji या लिंक वरून घेता येईल. या सेमिनारचा जास्ती जास्त इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त एस. के. माळी यांनी केले आहे.
या सेमिनारमध्ये महाराष्ट्र अकेडमी इस्लामपूर चे संस्थापक सचिव अस्लम शिकलगार व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर मार्गदर्शन करणार आहेत.
Share