ताज्या घडामोडी

व्हिओ भिलवडी येथे कृष्णा नदीकाठी दोन स्मशानभूमी आहेत.यापैकी एक कृष्णा घाटाजवळ आहे तर दुसरी स्मशानभूमी साखरवाडी जवळ आहे.साखरवाडीजवळ असणारी स्मशानभूमी आॅगस्ट २०१९ला आलेल्या महापुरामध्ये पूर्ण पणे जमीनदोस्त झाली होती. सदर स्मशानभूमीमध्ये साखरवाडी, पंचशिलनगर,साठे नगर तसेच गावातील काही भागातील मयत झालेल्या लोकांवरती याच स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार केले जातात.हिवाळा,उन्हाळा कसातरी निघून गेला परंतु सध्या पावसाळ्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे पावसाची रिमझिम सुरू झाली आहे.अशा परिस्थितीत एखाद्याचा मृत्यू झाला तर पावसामुळे सदर मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. स्मशानभूमी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून,सदर परिसरात मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या बसवत असल्यामुळे, मेंढ्यांच्या मलमुत्राची सदर भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
रिमझिम पाऊस व दुर्गंधीयुक्त वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने तसेच ऑगस्ट २०१९ च्या महापूरामध्ये जमीनदोस्त झालेल्या स्मशानभूमीची तब्बल दहा महिन्यानंतर ही उभारणी न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान सदर समस्येबाबत भिलवडीचे सरपंच विजयकुमार चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,सद्यस्थितीला ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमीच्या उभारणी साठी लागणारी रक्कम उपलब्ध नाही.सदर स्मशानभूमी हि सिमेंट काँक्रीटची पक्की , मजबूत व सर्व सोयीनियुक्त अशी बनविणार असून, त्यासाठी राज्यमंत्री विश्वजीत कदम व खासदार संजय काका पाटील यांच्याकडे स्मशानभूमी उभारणीस निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अशी माहीती सरपंच चोपडे व ग्रामविकास अधिकारी आर.डी.पाटील यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close