सांगली

औदुंबर येथे महापुराचे अनुषंगाने बोट चालवण्याचे दिले प्रशिक्षण

भिलवडी : दिनांक 27/ 06/2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1. 15 वाजेपर्यंत औदुंबर येथे आपत्ती व्यवस्थापन समिती, एन .डी .आर .एफ.चे जवान, तसेच मा. तहसीलदार पलूस यांचे मार्गदर्शनाखालीआगामी महापुराचे अनुषंगाने बोट चालवण्याचे प्रशिक्षण आयोजीत करणेत आले होते. त्यास भिलवडी पोलिस स्टेशनचे दहा कर्मचारी यांनी ते प्रशिक्षण पूर्ण केले आहे प्रशिक्षणा दरम्यान बोट चालवणे , पाण्यातून बाहेर पडण्याचे प्रशिक्षण , पोहणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत वाचण्यासाठी काय काय करावे लागते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.या प्रसंगी कैलास जे. कोडग सहायक पोलीस निरीक्षक भिलवडी पोलीस ठाणे हे उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close