ताज्या घडामोडी
अवैध गौण खजिन उत्खनन प्रकरणी तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू : अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम
सांगली : जिल्ह्यामध्ये अवैध गौण खजिन उत्खनन व वाहतूकीस प्रतिबंध करण्याकामी तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन शाखेमध्ये टोल फ्री क्रमांक 18002332396 हा सुरू करण्यात आलेला आहे. या टोल फ्री क्रमांकावर ज्या ठिकाणी गौणखनिज अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याबाबतची माहिती दिल्यास त्या ठिकाणी तहसलिदार यांच्यामार्फत तात्काळ कारवाई करण्यात येईल. जेणेकरून अवैध उत्खनन व वाहतूकीस आळा बसेल व शासनाचा महसूल वाढण्यास मदत होईल. तसेच आपत्ती व्यवस्थापन संबंधित कोणतीही माहिती अथवा सूचना द्यावयाच्या असल्यास सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी केले आहे.
Share