ताज्या घडामोडी

अन्न व औषध प्रशासनातर्फे केलेल्या कारवाईत गुळाचा 78 हजाराहून अधिक किंमतीचा साठा जप्त

सांगली : अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अधिकारी यांनी दि. 17 जून रोजी मे. संतगोळ ट्रेडींग कंपनी, मार्केट यार्ड सांगली येथे छापा टाकून भेसळीचा संशय असलेला व अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार परवाना न घेता पॅकिंग करीत असलेल्या गुळाचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरीत 78 हजार 472 रूपये किंमतीचा 2 हजार 308 किलोग्रॅम साठा जप्त केला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.
तसेच दि. 23 जून रोजी वाळवा तालुक्यात मे. जनता एजन्सीज पेठ या ठिकाणी छापा टाकून मिथ्थाछाप दर्जाचा व भेसळीच्या संशय असलेले पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर ॲक्वा फिज ब्रँडचा नमुना तपासणीसाठी घेवून उर्वरित 59 हजार 520 रूपये किंमतीचा 2 हजार 976 लिटर साठा जप्त करण्यात आला आहे. सदर अन्नपदार्थाचा उत्पादक मे. तनया बेव्हरेजेस, नगर रोड, सणसवाडी, ता. शिरोळ, जि. पुणे हा आहे.
विना परवाना गुळाचे रिपॅकींग व विक्री करणाऱ्या संस्थांचा शोध घेण्यात येत असून तसे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, र. ल. महाजन, एस. व्ही. हिरेमठ व नमुना सहायक चंद्रकांत साबळे यांनी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close