ताज्या घडामोडी

‘मिशन बिगीन अगेन’नुसार मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग सुरु

कोणत्या ग : राज्य शासनाने ‘मिशन बिगीन अगेन’ नुसार सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्यासंदर्भातील आवश्यक सर्व उपाययोजना लागू केल्यानंतर उद्योग सुरु करण्याला परवानगी दिली आहे. त्यानुसार मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सुमारे 15 उद्योगांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी 12 उद्योगातील कामकाज सुरु झाले आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी येथील मिहान प्रकल्पात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत विविध कंपन्यांनी कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये रिलायन्स (THALES), मेटाटेक एअर सिस्टिम इंडिया प्रा. लि. प्रवेश एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपन्या 100 टक्के कर्मचारी उपस्थितीसह तसेच ताल मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन लि., रिलायन्स (DRAL), कनव ॲग्रो, डाएट फूड इंटरनॅशनल, स्टेनोस्पेअर इंडिया प्रा. लि. आदी उद्योग कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार सुरु झाले असून त्यात 28 ते 75 टक्के कर्मचाऱ्यांची व कामगारांची उपस्थिती आहे. एअर इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये कर्मचारी व कामगार उपस्थित असून येथील नियमित कामाला सुरुवात झाली आहे. इतर उद्योगांमध्ये लुपिन लिमिटेड, एच. सी. एल. टेक्नॉलॉजी, हेवी एक्स वेअर बीसीएस इन्फोसिस लिमिटेड, टी. सी. एस. लि., टेक महिन्द्रा आदी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग समूहांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. यापैकी बहुतांश उद्योगात ‘वर्क फ्रॉम होम’नुसार नियमित कामकाज सुरु आहे.
मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर एम्स नागपूर, बीसीसीएल प्लॅन्यूमेट., बी. पी. एस., कॉन्कोर, डी. वाय. पाटील स्कूल, एफ. एस. सी. महिन्द्रा डेव्हलपर प्रा. लि., मोराज इन्फ्रा प्रा. लि., टी. सी. आय. इन्फ्रा लि., शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, भारतीय विद्या भवन आदी सेवा क्षेत्रातील 12 उद्योगांमध्ये ‘मिशन बिगीन अगेन’नुसार सुरुवात झाली आहे. मिहानच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रामध्ये असलेले विकास आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण प्रकल्प अल्टिएस, एस. बी. आय. बँक, कॅनरा बँक, बालाजी सर्व्हिसेस येथेही सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदींचा वापर करुन शासनाच्या विहित सूचनेनुसार कामकाज सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे तांत्रिक सल्लागार एस. व्ही. चहांदे यांनी दिली.
*****

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close